चार वर्षांमध्ये ४०० कोटींच्या महसूलाचे लक्ष्य
भारतातील विजउपकरणे निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी सुर्या रोशनी पंख्यांच्या बाजारपेठेत क्रांती आणण्यास सज्ज झाली आहे. कंपनीने सिलींग, टेबल, पेडस्टल, िभतीवरील आणि एक्स्झॉट पंखे बाजारपेठेत दाखल करण्याची योजना आखली आहे. ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणस्न्ोही उत्पादने बाजारपेठेत दाखल करुन या क्षेत्रात नवीन अनुभव दाखल करण्यावर कंपनीचा भर आहे.
सुर्या रोशनीचे व्यवस्थापकिय संस्थापक बी. राजू याबाबत म्हणाले की, देशभरात पसरलेले किरकोळ व्यापाऱ्यांचे विस्तृत जाळे सक्षमपणे कार्यरत आहे. तब्बल २ लाखांहूनही अधिक दुकानांचे हे जाळे हे कंपनीच्या उत्पादनांसाठी एक निष्ठावान पायाचे काम करते. कंपनी पुढील चार वर्षांमध्ये ४०० कोटी रुपयांचा महसून मिळविण्याचे लक्ष्य ठेवून आहे. या पंख्यांसाठी प्रोटो टाइप हे सुर्या टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इनोव्हेशन सेंटरने(एसटीआयसी) तयार केले आहेत.
सुर्या ग्रुप ही ३,८०० कोटी रुपयांची कंपनी असून वीज उत्पादनांव्यतिरिक्त ती जीआय पाइप विभागातही आघाडीवरील उत्पादक कंपनी आहे.