News Flash

घरांच्या मागणीतील वाढ टिकाऊ आणि आश्वासक – दीपक पारेख

अलीकडच्या काही महिन्यांमध्ये घरांच्या मागणीत दिसून आलेली वाढ ही तात्पुरती नसून, तिला रचनात्मक आधार असून ती यापुढेही टिकून राहील

दीपक पारेख

अलीकडच्या काही महिन्यांमध्ये घरांच्या मागणीत दिसून आलेली वाढ ही तात्पुरती नसून, तिला रचनात्मक आधार असून ती यापुढेही टिकून राहील, असा विश्वास एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केला.

व्याजदर घसरल्याने स्वस्त झालेले गृह कर्ज, तसेच त्यावरील विविध आर्थिक व कर सवलतींचे सुरू राहिलेले लाभ, स्थिरावलेल्या घरांच्या किमती या काही घटकांमुळे गेल्या काही महिन्यांत घरांच्या खरेदीला बहर आल्याचे पारेख यांनी सांगितले.

घरांच्या मागणीतील वाढ आश्चर्यकारक आहे, पण तिचे स्वरूप आश्वासकही असल्याचे ते म्हणाले. ‘वन वल्र्ड वन रिअ‍ॅल्टी’ या गृहनिर्माण तंत्रज्ञानावर आधारित दोन दिवसांच्या आभासी परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

पहिल्यांदाच घर खरेदी करणारे, त्याचप्रमाणे कुुटुंबाच्या वाढत्या गरजा ध्यानात घेऊन थोडे मोठे घर घेऊ पाहणाऱ्यांकडूनच ताज्या मागणीतील वाढ प्रामुख्याने दिसून आली आहे. दीपक पारेख म्हणाले, ‘घरातून काम करण्याच्या रुळत असलेल्या नवीन प्रघातामुळे कार्यस्थळापासून नजीकच्या ठिकाणी घर घेणे हा प्राधान्यक्रम मागे पडत चालला आहे. यातून घर खरेदीदारांना पसंतीसाठी अनेक चांगले आणि त्यांच्या आवाक्यात बसणारेही पर्याय उपलब्ध होऊ शकले आहेत.

तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचाच!

स्थावर मालमत्ता क्षेत्राकडून महसुलाच्या जेमतेम दीड टक्के इतकाच तंत्रज्ञानावर खर्च केला जातो. जगभरात सर्वत्र बांधकाम हे सर्वात अत्यल्प डिजिटलायझेशन झालेले उद्योग क्षेत्र आहे. अर्थात, यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रासंबंधी अद्ययावत आणि अचूक माहिती फार क्वचितच उपलब्ध होत असते, असे पारेख म्हणाले. त्यांच्या मते, तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेल्यास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या अत्यावश्यक घटकांची या उद्योग क्षेत्राला जोड मिळू शकेल. शिवाय त्यातून खर्चातही लक्षणीय कपात करणे त्यांना शक्य होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:49 am

Web Title: sustainable and promising growth in housing demand deepak parekh abn 97
Next Stories
1 वीजनिर्मिती क्षमतावाढीला बाधा!
2 रिलायन्स प्राणवायू क्षमता १,००० टन करणार
3 सोन्याची मार्च २०२१ मध्ये लक्षणीय आयात
Just Now!
X