नव्या युगाची सूक्ष्म-वित्त संस्था ‘स्वतंत्र मायक्रोफिन प्रा.लि.ने ग्रामीण महिलांच्या आर्थिक समावेशकतेच्या दृष्टीने पाऊल टाकताना, आपल्या ‘साथी’ नावाच्या एंड-टू-एंड मोबिलिटी उपाययोजना प्रस्तुत केली आहे. कर्ज व्यवस्थापन यंत्रणा आणि संग्रहणासारख्या क्षेत्रांमध्ये ही तंत्रज्ञानाधारित उपाययोजना वापरात येईल. स्वतंत्र मायक्रोफिनने त्रयस्थ सेवा प्रदात्यांसोबत केलेल्या भागीदारीने एक आगळेवेगळे आणि अतिशय माफक दरातील (१००० रुपयांच्या संरक्षणावर २० रुपयांहून कमी) कॅशलेस मेडिक्लेम उत्पादन आई-वडिलांना सहभागी करून कमाल पाच लोक असलेल्या कुटुंबांसाठी सादर केले आहे.

ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

या उपक्रमाबद्दल बोलताना, स्वतंत्र मायक्रोफिनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा तसेच अ‍ॅसोचॅमच्या सूक्ष्म-वित्त विभागाच्या को-चेअरमन अनन्या बिर्ला म्हणाल्या, कार्यान्वयाच्या सुरुवातीपासूनच १०० टक्के कॅशलेस वितरणात यशस्वी झालो आहोत. बदलाच्या आणि तांत्रिक उलथापालथीच्या शक्तीवर विश्वास असल्याने भारताच्या ग्रामीण गाभ्यामध्ये सशक्त आर्थिक समावेशकतेचा नमुना पेश केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई येथे मुख्यालय असलेली स्वतंत्र ही मध्यम आकाराच्या सूक्ष्म-वित्त संस्थांपैकी एक असून आपल्या आरंभापासूनच तिने रु. ४५० कोटी रुपयांहून जास्त कर्जाचे वितरण केले असून कंपनीचा वर्तमान कर्जवितरण २६० कोटींचे आहे. कर्जवितरणातील ही वाढ वार्षिक सरासरी २२० टक्के आहे. ८०० सभासदांच्या सशक्त कार्यदलासोबत तिने आपल्या आरंभापासून अंदाजे ३,००,००० ग्रामीण स्त्रियांना आपल्या सेवांचा लाभ पोहोचविला आहे. ८३ शाखांपर्यंत तिने आपले जाळे वाढवले असून, ५ राज्यांमधल्या जवळ्पास ११,००० गावांना ती सेवा देत आहे.