क्रिकेटचा रंजक खेळ प्रकार ट्वेंटी२० आणि गुंतवणुकीत खूप साम्य आहे. दोन्हींच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धोरणाची आखणी आणि दीर्घकालीन दृष्टिकोन. त्यातही ट्वेंटी२० या प्रकारात धोरणासह काळजीपूर्वक नियोजन आणि संयम यांचीही तितकीच आवश्यकता असते. ट्वेंटी२० सामन्यांसारखे तुम्हीही गुंतवणुकीचे ११ मार्ग जोपासून एक रंगतदार सामन्याचे साक्षीदार होऊ शकता.१. शारीरिक तंदुरुस्ती = गुंतवणूकदार सजगता

एका खेळाडूच्या तंदुरुस्तीवर ज्या प्रकारे त्याची कामगिरी अवलंबून असते त्याप्रकारे गुंतवणूकदारांमधील जागृतीही कोणत्या प्रकारची गुंतवणूक करावी यासाठी मदत करते. संपूर्ण माहिती असलेला गुंतवणूकदार याच्या-त्याच्याकडून ऐकलेल्या, कुठल्याही सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि जेव्हा त्याला कुठली शंका येते तेव्हा तो व्यावसायिकांशी नक्की काय करावे याबाबत विचारविनिमय करतो.

२.  संघ निवड = मालमत्ता विभाजन

वेगवान आणि फिरकी गोलंदाज, फलंदाज, यष्टिरक्षक यांसारख्या विविध गुण असलेल्या खेळांडूंनी संघ बनतो. त्याप्रमाणेच समभाग, कर्ज, रोख आणि सोने, स्थावर मालमत्ता यासारख्या मालमत्तांची योग्य मिसळण आवश्यक असते. एक वेगवान गोलंदाज हा समभागसंलग्न म्युच्युअल फंडासारखाच आहे. तर ऑल राउंडर हा बॅलन्स फंडासारखा आहे. असे असले तरी योग्य गुणांच्या खेळाडूंनीच एक मजबूत टीम बनते. तुमच्या गुंतवणुकीचेही असेच आहे. त्यामुळे गुंतवणूक करत असताना तुमच्या मालमत्तेची योग्य मिसळण करण्यात येईल. तसेच तुमचा पोर्टफोलियो एकदम एका मालमत्ता प्रकारामुळे घटणार नाही याची काळजी गुंतवणूक करताना नक्की घ्या.

३.  खेळाची योजना = जोखमीची इच्छा

प्रत्येक फलंदाज हा एखादा षटकार किंवा षटकारांची मालिका लगावताना आधी काहीसा विचार जरूर करतो आणि त्यामुळे प्रत्येक चेंडू हा योग्य वेळी काळजीपूर्वक तो असा टोलवू पाहतो की ज्यामुळे जास्तीत जास्त फायदा होईल. ज्याप्रमाणे खेळाडू जोखीम घेण्यापूर्वी आपल्या कृतीचे मूल्यांकन करतो. त्याप्रमाणेच तुम्हीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्यप्रकारे तयारी करायला हवी. प्रत्येक विभाजकीय वर्गात योग्य मालमत्ता टाकणे आणि योग्य आणि सुरक्षित काळाचा विचार देखील करणे.

४.  नाणेफेकीचा कौल जिंकणे = एक चांगली सुरूवात

टॉस एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो आणि एक चांगली सुरुवात होण्यास कारणीभूत ठरतो. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तितकी ती चांगली सुरूवात असे. कारण तुमचे धन वाढण्यास आणि त्याचे फायदे मिळायला जास्त वेळ मिळू शकतो. त्यामुळे एक क्षण ठरवा आणि तुमच्या संपत्तीला वेळेचा योग्य फायदा करून द्या. दीर्घकाळासाठी तो तुमचा विजयी क्षण असेल हे तुमच्या लक्षात येईल.

५. प्रशिक्षकाची भूमिका = व्यावसायिक व्यवस्थापन

प्रशिक्षक विपुल माहिती, अनुभव आणि क्षेत्रातील विशेष तुमच्यासाठी घेऊन येतो. गुंतवणुकीत निधी व्यवस्थापक ही भूमिका बजावतात. अधिक सखोल संशोधन आणि खासगी साधने यांच्या सहाय्याने ते प्रत्येक कंपनी समभाग आणि कर्जाच्या साधनांचे, योजनेच्या कामगिरीत गुंतवणूक करण्याआधी पृथ्थकरण करतात. व्यावसायिक व्यवस्थापन हा म्युच्युअल आणि फंड गुंतवणुकीतील ‘हॉलमार्क’ आहे.

६. एकेरी धावा = पद्धतशीर गुंतवणूक

प्रत्येक धाव मोजली जाते आणि याचप्रकारे तुमची गुंतवणूक पद्धतशीरपणे होते. मासिक गुंतवणूक म्हणजे एक एक धाव होय. तुमची धावसंख्या वाढत राहील याची काळजी ती घेते. तर एकरकमी गुंतवणूक ही ‘ओकेजनल बाउंड्री’ म्हणून गणता येते. पद्धतशीर गुंतवणूक ही वेळ पूर्ण झाल्यावर उत्तम परिणाम देणारी असते.

७.  पॉवर प्ले = जास्तीत जास्त परतावे

प्रत्येक सामन्यात एकदा तरी अशी वेळ येतेच की फलंदाजाला चौकार आणि षटकारांची बरसात करण्याची गरज भासते. गुंतवणुकीतही असेच आहे, एक वेळ अशी येते की गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणुकीच्या जास्तीत जास्त विकासाकडे पाहू शकतो. ते तसे सोपे आहे, समभागनिगडित फंडासह बाजारपेठेत प्रवेश करताना एकावेळी दीर्घकाळासाठी रोख रक्कम घालता येते. हे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीत योग्य वेळी चौकार आणि षटकार मारण्यासारखेच आहे, असा विचार करा.

८. बळी मि़ळविणे = वेळेचे परीक्षण

चांगला फलंदाज लवकर बाहेर पडणे किंवा चांगल्या गोलंदाजाला कमी बळी मिळणे असे कधी कधी होतच असते. तुमच्या गुंतवणुकीबाबतही असेच होत असते. अशा वेळी तुमच्या पोर्टफोलियोमध्ये एक नजर टाका आणि दीर्घकालीन विकासासाठी काही बदल करण्यापूर्वी व्यावसायिकांची मदत घ्या.

९.  दबावाखाली खेळ = गुंतवणूक करीत रहा

एका उत्तम फलंदाजाला माहीत असते की सुरक्षित कसे खेळावे आणि टोला कधी हाणायचा ते. गुंतवणुकीतही तसंच आहे. बाजार जेव्हा खाली-वर होतो तेव्हा बहुतांश गुंतवणूकदार त्रासतात. पण तुम्हाला ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत गुंतवणूक करतच रहायची आहे हे लक्षात ठेवा. योग्य धोरण म्हणजे वेळ. त्यामुळे जोपर्यंत तुमचे दीर्घकालीन ध्येय बदलत नाहीत तोपर्यंत गुंतवणूक करत रहा आणि बदलत्या समाजमनाचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका.

१०. धावसंख्या आणि आकडेवारी = ध्येयाचे परीक्षण

जर दुसऱ्यांदा फलंदाजी आली असेल तर धावसंख्या काय आहे, कितीच्या प्रमाणात धावा काढायच्या आहेत आणि अशा इतर गोष्टींचे या वेळी महत्त्व असते. तुमच्या गुंतवणुकीतही हेच महत्त्वाचे असते आणि त्यावर लक्ष ठेवावे लागते. ठराविक काळानंतरची तपासणी आणि प्रत्येक निधीमागचे परिक्षण हे ठराविक मुद्दे आणि ते वेळेनुरुप कसे योग्य आहे तेही लक्षात येईल.

११.  खेळाडूचे मूल्यांकन = वैयक्तिक कामगिरी

जागतिक मूल्यांकन स्पष्ट होण्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या कौशल्यावर आधारित मूल्यांकन केले जाते. गुंतवणुकीतही तसेच तर आहे. सध्याच्या नोंदी आणि इतिहास यावरच निधीचे मूल्यांकन होते. तुमचा निधी कुठेही गुंतवण्याआधी योग्य प्रकारे त्याचा घरचा अभ्यास आणि तपासणी करणे गरजेचे आहे.

(संदर्भ : एल अँड टी म्युच्युअल फंड)