होलटेकबरोबर शासनाचा करार; ४,९०० कोटींची गुंतवणूक होणार

अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये इंधन साठवणूक आणि ऊर्जा वहनासारख्या विविध उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या उपकरणांसह इतर आवश्यक सामग्री पुरवठादारांमध्ये अग्रणी होलटेक इंटरनॅशनल कंपनीने महाराष्ट्रामध्ये उत्पादन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
pmc bank scam marathi news, pmc bank
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : सिंधुदुर्गातील १८०७ एकर जमिनीवर ईडीची टाच, जमिनीची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

बुधवारी झालेल्या सामंजस्य करारानुसार, हा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कंपनीकडून ४,९०० कोटी रुपयांची (६८ कोटी डॉलर) गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. होलटेक कंपनीच्या अमेरिकेतील प्रकल्पासारखाच हा प्रकल्प असेल, अशी माहिती करारावेळी देण्यात आली.

ऊर्जा आणि प्रक्रिया, एरोस्पेस, पेट्रोकेमिकल आणि इतर क्षेत्रातील कंपन्यांना संयंत्रांची निर्मिती करताना लागणाऱ्या अवजड सुटय़ा भागांची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य शासनाकडून प्रकल्प उभारणीसाठी लागणारी मंजुरी-परवानगी एक खिडकी योजनेतून सुलभरीत्या देण्यात येणार आहे.

याबाबत राज्य शासनाने होलटेक कंपनीसमवेत बुधवारी एक सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी होलटेक कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णा सिंग, कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष ज्योती चॅटर्जी आणि शासनाच्या उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षरी करून प्रतींची देवाणघेवाण केली.

होलटेक इंटरनॅशनल ही ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील, विशेषत: अणुऊ र्जा क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ कंपनी आहे. आजवर विविध ३५ देशातील २०० हून अधिक अणुऊ र्जा प्रकल्पांना या कंपनीने सुटे भाग पुरविले आहेत.