News Flash

टाटा एआयएची ‘संपूर्ण रक्षा’ योजना

एकंदर तीन नवीन योजना कंपनीने आणल्या आहेत.

मुदतपूर्तीच्या वेळेस पॉलिसीधारकाने भरलेल्या सर्व विमा हप्त्यांची परतफेड करणारे अनोखे वैशिष्टय़ असलेली शुद्ध विमा योजना टाटा एआयए लाइफने आणली आहे. संपूर्ण रक्षा ही ‘नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग टर्म अश्युरन्स’ योजना टाटा एआयए लाइफ संपूर्ण रक्षा+ आणि शुद्ध आरोग्य मुदत विम्याचा प्रकार असलेल्या टाटा एआयए लाइफ वायटल केअर प्रो अशा एकंदर तीन नवीन योजना कंपनीने आणल्या आहेत.

कुटुंबाला सुरक्षित भविष्य प्रदान करण्यासाठी पुरेशा जीवन विम्याची आवश्यकता असण्यावर टाटा एआयए लाइफचा कायम भर राहिला आहे. कंपनीचे वितरण प्रमुख ऋषी श्रीवास्तव यांच्या मते, ‘लोक बरेचदा आपल्या भविष्यासाठीच तरतूद करत राहतात. त्यामुळे अचानक एखादी समस्या उभी राहिल्यास त्याच्याशी दोन हात करण्यास ते तयार नसतात. तथापि नव्याने प्रस्तुत झालेल्या उत्पादनांमुळे ग्राहकांना केवळ आपल्या भविष्याचाच भक्कम पाया रचता येणार नाही तर आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी आर्थिक बळही प्राप्त होईल, असा त्यांनी दावा केला. ग्राहकांना त्यांना किती विमा संरक्षण आवश्यक आहे हे मोजण्यास कंपनीचा प्रशिक्षित विक्री संघ मदत करणार आहे.

दहा वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंत विविध मुदत काल असलेल्या  या योजना उपलब्ध असून कमाल ८० वर्षे वयाच्या व्यक्तीला घेता येतील. त्यामुळे ‘संपूर्ण रक्षा’ योजना जीवनभराच्या विमा सुरक्षेचा कालावधी वाढवते. शिवाय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम एकरकमी किंवा नियमित मासिक उत्पन्न पद्धतीने वारसदारांना मिळविण्याचा पर्याय देते. तर पॉलिसी कालावधीत ग्राहक हयात असल्यास भरलेले हप्ते परत मिळविण्याची सोयही या योजनेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 2:35 am

Web Title: tata aia
Next Stories
1 ‘जीएसटी’ दरनिश्चिती लांबणीवर!
2 ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खरेदी उत्साहाला सायबर हल्ल्याचे विघ्न!
3 मल्याच्या गोव्यातील किंगफिशर व्हिलाच्या लिलावातही बँकांना अपयश
Just Now!
X