राष्ट्रीयीकरणातून ६४ वर्षांपूर्वी तुटलेले भावनिक बंध पुन्हा जोडण्यासाठी उत्सुक

आतबट्टय़ाच्या ठरलेल्या दूरसंचार क्षेत्रातून टाटा समूहाच्या माघारीचे स्पष्ट संकेत देतानाच, ८५ वर्षांंपूर्वी टाटा साम्राज्याचा भाग असलेल्या एअर इंडियाच्या सरकारकडून प्रस्तावित खासगीकरणात स्पर्धक बनण्याचा आणि आक्रमकपणे बोली लावण्याचा समूहाचा निर्धार कायम आहे.

एअर इंडियाच्या ६४ वर्षांंपूर्वी झालेल्या राष्ट्रीयीकरणाने टाटा समूहाला व्यवसायावरील मालकी गमवावी लागली होती. आता मात्र सरकारनेच एअर इंडियाचे पुन:खासगीकरणाचे संकेत दिले आहेत. त्या बाबत अंतिम निर्णय झाल्यास टाटांचे त्यात निष्टिद्धr(१५५)तच स्वारस्य असेल, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दूरचित्रवाणीच्या वृत्त—वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले आहे. टाटा समूहाचे सध्या हवाई क्षेत्रात दोन भागीदारम्य़ांमार्फत छोटेखानी अस्तित्व आहे. सिंगापूर एअरलाइन्स आणि एअर एशियाबरोबरच्या भागीदारीतून भारताच्या हवाई क्षेत्रातील अनुRमे विस्तारा आणि एअर एशिया या दोन कंपन्यांत टाटांची भागभांडवली मालकी आहे. ही बाबही एअर इंडियासाठी बोली लावताना आपल्या समूहाच्या पथ्यावर पडेल, असे चंद्रशेखरन यांनी सूचित केले. तथापि सरकारकडून एअर इंडियातील भागभांडवल कोणत्या प्रकाराने विकले जाईल, हे अद्यप स्पष्ट नसून, त्यावर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रचंड मोठय़ा कर्जाच्या बोजाने वाकलेली एअर इंडिया ही सरकारच्या नाकर्तेपणाचे प्रतीक बनली आहे. नरेंद्र मोदी सरकारने जरी गेल्या तीन वर्षांत या कंपनीला तारण्यासाठी १६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असली, तरी तिच्या पुनरूज्जीवनाचा भार सरकारी तिजोरीला वाहता येणे अशक्य असल्याची कबुली सरकारनेही दिली आहे.

इतिहासाचे एक वर्तुळ पूर्णत्वाला

टाटा सन्सने १९३२ साली टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. कराची ते मुंबई अशा या कंपनीच्या पहिल्या उड्डाणात खुद्द जेआरडी टाटा यांनी वैमानिक म्हणून भूमिका बजावली होती. १९४६ साली टाटा एअरलाइन्सने सार्वजनिक कंपनी म्हणून रूप धारण करताना, तिचे ‘एअर इंडिया’ असे नामकरण केले. १९५३ साली सरकारने तत्कालीन धोरणानुसार, या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. जेआरडींच्या मते, जगातील सर्वोत्तम हवाई सेवांपैकी ही एक कंपनी होती. याच ममत्त्वामुळे त्यांच्या हाती १९७७ सालापर्यंत एअर इंडियाची सूत्रे होती.