News Flash

टाटा मोटर्सचा तिमाही तोटा घसरून ७,५८५ कोटींवर

विक्रीत झालेल्या सुधारणेचा परिणाम

विक्रीत झालेल्या सुधारणेचा परिणाम

नवी दिल्ली :वाणिज्य वाहनांच्या क्षेत्रातील अग्रणी आणि आलिशान प्रवासी वाहनांची निर्मात्या टाटा मोटर्सने विक्रीत झालेल्या चांगल्या सुधारणेच्या परिणामी चौथ्या तिमाहीत तोटय़ाच्या प्रमाणात लक्षणीय कपात केली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर तिमाहीतील असलेले ९,८६४ कोटी रुपयांच्या तोटय़ाचे प्रमाण, यंदाच्या मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत ७,५८५ कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत खाली आले आहे.

चौथ्या तिमाहीत कंपनीने कमावलेल्या एकूण महसुलाचे प्रमाण ८९,३१९ कोटी रुपये होते, जे वर्षभरापूर्वी म्हणजे २०१९-२० मधील चौथ्या तिमाहीत ६३,०५७ कोटी रुपये असे होते.

टाटा मोटर्सची ब्रिटिश उपकंपनी असलेल्या जग्वार लँड रोव्हरच्या (जेएलआर) पुनर्रचनेवरील खर्च तसेच काही मालमत्ता निर्लेखनावरील एकूण खर्च हा १४,९९४.३० कोटी रुपयांचा होता, ज्याचा कंपनीच्या एकूण नफ्याच्या प्रमाणावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो.

तथापि जेएलआरला जागतिक स्तरावर पसंतीची आलिशान मोटार म्हणून स्थान कमावून देऊन, २०२५-२६ पर्यंत दोन अंकी नफाक्षमतेपर्यंत मजल मारण्याचे ‘रिइमॅजिन’ हे महत्त्वाकांक्षी दूरगामी धोरण टाटा मोटर्सने आखले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:20 am

Web Title: tata motors q4 loss narrows to rs 7585 crore zws 70
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’ पुन्हा ५० हजारांवर
2 मुंबईत पेट्रोल ९९ रुपयांपुढे
3 सेन्सेक्सची उसळी, ५० हजारांपार; निफ्टी १५,११८ वर
Just Now!
X