News Flash

टाटा मोटर्सला विक्रीत वाढीचे बळ; ह्य़ुंदाईचा घसरण-क्रम

वाढ मारुती सुझुकीने जानेवारीमध्ये एकूण १,१६,६०६ वाहनांची विक्री करून जवळपास १४ टक्के विक्रीतील वाढ नोंदविली. देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीतील वाढही ९ टक्क्य़ांहून अधिक आहे. यामुळे

| February 4, 2015 06:31 am

वाढ

मारुती सुझुकीने जानेवारीमध्ये एकूण १,१६,६०६ वाहनांची विक्री करून जवळपास १४ टक्के विक्रीतील वाढ नोंदविली. देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीतील वाढही ९ टक्क्य़ांहून अधिक आहे. यामुळे एक लाख विक्रीचा स्तर कंपनीला या कालावधीत राखता आला.
* यामाहा मोटर इंडियाच्या दुचाकी विक्रीत २०.८२ टक्के वाढ झाली. स्पोर्ट बाईक म्हणून विशेष ओळख असलेल्या कंपनीची यंदा ३९,३०९ वाहने विकली गेली आहेत.
* आयशर मोटर्सचा भाग असलेल्या रॉयल एनफिल्डने यंदा तब्बल ४३ टक्के विक्रीत वाढ नोंदविली. जानेवारीत कंपनीच्या २८,९२७ दुचाकींची विक्री झाली. कंपनीच्या मोटरसायकलची निर्यातही तब्बल ८२ टक्के झाली आहे.

* टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीत यंदा केवळ १.२ टक्क्य़ांची वाढ नोंदली गेली. कंपनीच्या १.८८ लाख वाहनांची विक्री जानेवारीमध्ये झाली. कंपनीच्या स्कूटर विक्रीने मात्र २४ टक्क्य़ांची भर घातली आहे.

घट
* जनरल मोटर्सची विक्री गेल्या महिन्यात १६.०१ टक्क्य़ांनी रोडावत ४,६६७ वर येऊन ठेपली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीची पाच हजारांहून अधिक वाहने विकली गेली होती.
* बजाज ऑटोच्या मोटरसायकल विक्रीत यंदा १२ टक्क्य़ांची घट झाली आहे. कंपनीने जानेवारीत २,४६,९५५ दुचाकी विकल्या. कंपनीची निर्यात किरकोळ, ४ टक्क्य़ांनी वाढून १,४२,९९२ झाली आहे. कंपनीची वाणिज्य वाहने मात्र १४ टक्क्य़ांनी वाढली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2015 6:31 am

Web Title: tata motors sale increase in compare to hyundai
Next Stories
1 ‘नो रिटर्न गिफ्ट’?
2 अंबानी, बिर्लाही बँक व्यवसायात!
3 पतधोरण निर्थक ठरणार
Just Now!
X