20 January 2018

News Flash

टाटा साम्राज्याला चिनी-चेरीचे कोंदण!

टाटा समूहातील टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी स्वामित्व मिळविल्यानंतर जग्वार आणि लॅण्ड रोव्हर या मोटारींच्या ब्रॅण्डला विशेषत: चीनमध्ये चांगले दिवस आले. टाटा मोटर्सच्या निर्यात महसुलात २००५

Updated: November 20, 2012 4:55 AM

टाटा समूहातील टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी स्वामित्व मिळविल्यानंतर जग्वार आणि लॅण्ड रोव्हर या मोटारींच्या ब्रॅण्डला विशेषत: चीनमध्ये चांगले दिवस आले. टाटा मोटर्सच्या निर्यात महसुलात २००५ मध्ये चीनमधील विक्रीचे असलेले केवळ एक टक्का प्रमाण आता थेट ८० टक्क्यांपर्यंत गेले आहे. नेमके हेच ओळखून कंपनीने चीनमध्येच नवा वाहन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले. या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ रविवारी कंपनीचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते झाला. चीनमधील चेरी ऑटोमोबाईलच्या भागीदारीतून हा प्रकल्प शांघायनजीकच्या चान्ग्शू येथे आकारास येणार आहे. यासाठी साधारण ९,६२५ कोटी रुपयांची (१.७५ अब्ज अमेरिकी डॉलर) गुंतवणूक करण्यात आली आहे. नवी कंपनी चेरी जेएलआर ऑटोमोटिव्ह नावाने उदयास येणार असून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

चालू आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ५.३ टक्केपर्यंत वित्तीय तूट राखण्याचे  उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. मार्च २०१३ ला आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत आणखी निर्णय होतीलच.
– सी. रंगराजन,
पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार (सोमवारी दिल्लीत)

First Published on November 20, 2012 4:55 am

Web Title: tata motors with cherry automobiles in chaina
  1. No Comments.