एका भारणातून ३०० किलोमीटरचा पल्ला

मुंबई : एमजी मोटर्स, किआ अशा विदेशी कंपन्यांची विजेवर चालणाऱ्या वाहनांची सज्जता वेग घेत असतानाच टाटा मोटर्स या भारतीय कंपनीने तिचे नेक्सॉन हे कॉम्पॅक्ट श्रेणीतील वाहन विजेवरील वाहन गटात सादर केले आहे. एकदा भारणातून (चार्जिग) ३०० किलोमीटरचा पल्ला गाठू शकणारी झिपट्रॉन तंत्रज्ञानाची शक्ती आणि आठ वर्षे वॉरंटी अशी वैशिष्टय़े असलेल्या नेक्सॉन ईव्ही कारची किंमत १५ ते १७ लाख रुपयांदरम्यान असेल. ही कार प्रत्यक्षात आगामी महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध असेल. मात्र नोंदणी देशातील प्रमुख २२ शहरांमधून शुक्रवारपासून सुरू होत आहे. मुंबईतील कार सादरीकरणप्रसंगी कंपनीच्या विजेरी वाहन विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा व टाटा मोटर्सचे मुख्याधिकारी गुएंटर बुश्चेक उपस्थित होते. कंपनीने यापूर्वी तिचे सेदान श्रेणीतील टिगोर हे वाहन विजेवर तयार केले आहे. कंपनीने या गटातील पहिली १,००० वाहने सरकारच्या विविध विभागांना पुरविली आहेत.