प्रसून सिकदर

कर नियोजन करीत असताना स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि पालकांसाठी आरोग्य विम्याचे कवच घेणे अनेकांगाने उपयुक्त ठरेल. आरोग्य विमा हे कर-बचतीचे अतिरिक्त साधन असून, प्रत्येकाच्या गुंतवणूक भांडारातील हा एक अत्यावश्यक घटक आहे.

आरोग्य विम्याच्या साहाय्याने कर बचतीसाठी लक्षात घ्यावयाचे मुद्दे –

* कर लाभाच्या दाव्यासाठी मर्यादा

केवळ कर वाचविण्यासाठीच नव्हे तर दीर्घावधीत आíथक उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दृष्टीनेही योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड महत्त्वाची ठरते. आरोग्य विम्याद्वारे करांचा बोजा हलका होण्याबरोबरच, अनपेक्षित वित्तीय संकटांपासून संरक्षणाचीही आपोआपच काळजी घेतली जाते. आजारपणात बचतीतून जमविलेल्या पुंजीला गळती लागण्यापासून वाचवून दर्जेदार वैद्यकीय निगेची तजवीज यातून केली जाते.

वैद्यक विम्यासाठी भरलेल्या हप्त्यांची कलम ८० डी अन्वये करपात्र उत्पन्नातून वजावट पॉलिसीधारकाला मिळविता येते. ही वजावट अशा प्रकारे आहे –

* स्वत:साठी घेतलेला आरोग्य विमा :

– स्वत:साठी आणि कुटुंबासाठी (जोडीदार, अवलंबित मुले यासह) आरोग्य विम्याच्या कमाल २५,००० रुपये प्रति वर्ष इतक्या भरलेल्या हप्त्याची वजावट मिळविता येते.

– जर करदाता ज्येष्ठ नागरिक असल्यास ही वजावट वार्षकि कमाल ५०,००० रुपये इतकी आहे.

* पालकांसाठी आरोग्य विमा घेतला असेल :

– पालकांसाठी घेतलेल्या आरोग्य विम्यावर वार्षकि कमाल २५,००० रुपये प्रति वर्ष इतक्या भरलेल्या हप्त्याची वजावट मिळविता येते.

– जर पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास विम्यावर वार्षकि कमाल ५०,००० रुपये प्रति वर्ष इतक्या त्यांच्यासाठी भरलेल्या हप्त्याची वजावट मिळविता येते.

म्हणजे पॉलिसीधारकाचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्याच्या पालकाचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० डी अन्वये कमाल ७५,००० रुपये इतकी वजावट त्याला प्रति वर्ष मिळविता येईल. आणि पॉलिसीधारक स्वत: साठीपुढचा असल्यास आणि तो स्वत:सह वयोवृद्ध पालकांच्या आरोग्यविम्याचे हप्ते भरत असल्यास ही वजावट वर्षांला कमाल १,००,००० रुपयेही असू शकेल.

* आरोग्याची तपासणी 

पॉलिसी कालावधीत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या व चाचण्यांवर होणाऱ्या खर्चातूनही करपात्र उत्पन्नात वजावट मिळवून कर वाचविला जाऊ शकतो. पॉलिसीधारक अशा तपासण्या व चाचण्यांवर होणाऱ्या खर्चाची प्रति वर्ष कमाल ५,००० रुपये इतकी वजावट अतिरिक्त स्वरूपात मिळवू शकेल. याचा अर्थ तुम्ही आरोग्य विम्यासाठी (मेडिक्लेम) वार्षकि २०,००० रुपये हप्ता भरत असाल आणि तुम्हाला रोगनिदान चाचण्या व तपासण्यांसाठी ५,००० रुपये खर्च झाला असल्यास, कलम ८० डी अन्वये २५,००० रुपयांची एकूण वजावट तुम्ही मिळवू शकाल.

*  विमा कंपन्यांचे राइडर्स 

कर बचतीसाठी आरोग्य विमा घेण्याचे लाभ आपण पाहिलेच, परंतु अनेक विमा कंपन्या पॉलिसीधारकाला राइडर्स आणि अन्य लाभही देत असतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कंपनीकडून जरी समूह आरोग्य विम्याची पॉलिसी असली तरी प्रत्येकाने स्वत:साठी आणि कुटुंबासाठी अतिरिक्त आरोग्य विम्याचे कवच मिळविणे आवश्यक आहे. कारण वैद्यकीय खर्चासंबंधी महागाईचा दर खूपच अत्युच्च असून, वेळप्रसंगी तो भागविण्यासाठी कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी पुरेशी ठरणार नाही. आयुर्वमिा पॉलिसीअंतर्गत गंभीर आजारपण (क्रिटिकल इलनेस) अथवा मेडिकल इन्शुरन्स राइडर्ससाठी भरलेल्या हप्त्याची रक्कम याच कलमाअंतर्गत वजावटीसाठी पात्र ठरते.

* रोखीने हप्ता भरल्यास कर लाभ मिळणार नाहीत..

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर करबचतीचा लाभ मिळवायचा असल्यास, आरोग्य विमा पॉलिसीचे हप्ते हे धनादेश, डिमांड ड्राफ्ट, डेबीट कार्ड, नेटबँकिंग याद्वारेच भरले गेले पाहिजेत, ते रोख रकमेद्वारे भरले जाऊ नयेत. मात्र रोगनिदान चाचण्या अथवा तपासण्यांसाठी होणारा खर्च हा रोखीतून भागविला गेला असला तरी त्यावर कर वजावट मिळविली जाऊ शकते.

सारांशात, दुर्दैवी अनपेक्षित प्रसंगात स्वत:सह कुटुंबाच्या बचावाचे महत्त्वाचे आरोग्य विमा पॉलिसी हे एक साधन आहेच. बरोबरीनेच ते कर-कार्यक्षमही असल्याने एक आदर्श वित्तीय गुंतवणुकीचे साधनही ठरते.

(लेखक, मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी)