18 September 2020

News Flash

‘रिटर्न्स’च्या मात्रेत ३३ टक्क्यांची वाढ

करनिर्धारण वर्ष २०१३-१४ साठी (म्हणजे गेल्या वर्षी) प्राप्तिकर विवरण अर्थात रिटर्न्स दाखल करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय ३३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

| April 23, 2015 01:37 am

करनिर्धारण वर्ष २०१३-१४ साठी (म्हणजे गेल्या वर्षी) प्राप्तिकर विवरण अर्थात रिटर्न्स दाखल करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय ३३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ते पाहता चालू वर्षांत म्हणजे करनिर्धारण वर्ष २०१४-१५ साठी रिटर्न्सच्या मात्रेत आणखी वाढीची अपेक्षा केली जात आहे. २०१४ मध्ये एकूण ४.७ कोटी विवरणपत्रे करदात्यांकडून दाखल करण्यात आली. जी आधीच्या वर्षांतील ३.५२ कोटींच्या तुलनेत तब्बल ३३ टक्क्यांनी अधिक आहेत, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
अर्थात देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे वाढलेले प्रमाणही जेमतेम ४ टक्के इतकेच आहे. तथापि करदात्यांच्या संख्येत वाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून, प्राप्तिकर विभागाकडून दिल्या जाणाऱ्या ‘परमनन्ट अकाऊंट नंबर- पॅन कार्ड’ हे जनसामान्यांकडून मिळविले जावे यासाठी सरकारकडून लवकरच ‘जन धन’च्या धर्तीवर मोहीम राबविली जाण्याचेही संकेत आहेत. चालू अर्थसंकल्पात १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या उलाढालीवर ‘पॅन’ क्रमांकाची नोंद सक्तीची करणारी तरतूद करून, उत्पन्न  व खर्चविषयक माहितीचा स्रोत म्हणून ‘पॅन’च्या वापराचा सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 1:37 am

Web Title: tax returns filings rise by 33 percent
Next Stories
1 घसरण अखेर थांबली; सेन्सेक्समध्ये द्विशतकी भर
2 आता ४ डी तंत्रज्ञानावर चित्रपटाचा आस्वाद
3 वाहन शोधकर्त्यांचा गुगलवर ‘यू’ टर्न!
Just Now!
X