News Flash

टीबीझेडशी ‘फ्रँचाइझी’ भागीदारीची उद्योजकांना संधी

त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी (टीबीझेड) या नाममुद्रेखाली दीडशे वर्षांची परंपरा असलेली सुवर्णपेढीने त्यांची दालने चालविण्यासाठी (फ्रॅन्चायझी) उद्योजकांना आवाहन केले आहे.

| January 15, 2015 12:30 pm

त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी (टीबीझेड) या नाममुद्रेखाली दीडशे वर्षांची परंपरा असलेली सुवर्णपेढीने त्यांची दालने चालविण्यासाठी (फ्रॅन्चायझी) उद्योजकांना आवाहन केले आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या टीबीझेडने नव्या उद्यमशील व्यक्तींना देशातील किरकोळ रत्न व दागिने व्यवसायात कार्य करण्याची संधी निर्माण करून दिल्याचा दावा यानिमित्ताने कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत झव्हेरी यांनी केला. कंपनीची सध्या स्वमालकीची देशभरातील २२ शहरांमध्ये २८ दालने आहेत. कंपनीने तयार केलेल्या विविध २२ हजारांहून अधिक दागिन्यांची उपलब्धता या दालनांमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 12:30 pm

Web Title: tbz franchise
Next Stories
1 हवालाद्वारे व्यवहार केल्याची बिर्ला समूहातील वित्तीय अधिकाऱयाची कबुली
2 रिझर्व्ह बॅँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची घट, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
3 शेअर बाजारही आता उद्योगक्षेत्राच्या सामाजिकतेचा कस जोखणार!
Just Now!
X