News Flash

सणांच्या मुहूर्तावर टीबीझेडचे खरेदीसुलभ ‘गिफ्ट कार्ड’

यंदाच्या सणांचा मुहूर्त साधून टीबीझेड अर्थात त्रिभुवनदास भिमजी झवेरी या तयार दागिन्यांच्या साखळी दालनाने खरेदीदारांसाठी विशेष ‘गिफ्ट कार्ड’ सादर केले आहेत.

| September 28, 2013 12:28 pm

यंदाच्या सणांचा मुहूर्त साधून टीबीझेड अर्थात त्रिभुवनदास भिमजी झवेरी या तयार दागिन्यांच्या साखळी दालनाने खरेदीदारांसाठी विशेष ‘गिफ्ट कार्ड’ सादर केले आहेत. मित्र, नातेवाईक, सहकारी तसेच कार्यालयातील कर्मचारी, व्यावसायिक भागीदार यांच्यासाठी या गिफ्ट कार्डाद्वारे खरेदी करता येईल. १५० जुनी नाममुद्रा असलेल्या टीबीझेडने यामाध्यमातून सुलभ सुवर्णखरेदीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एक हजार ते ५० हजार रुपयेपर्यंतच्या रकमेचे हे गिफ्ट कार्ड असून कंपनीच्या सर्व दालनांमध्ये ते उपलब्ध आहेत. यंदाचा दसरा ते येत्या वर्षांतील व्हेलेन्टाईनर्पयच्या विशेष दिनापर्यंत खरेदीची संधी याद्वारे उपलब्ध झाल्याचे टीबीझेडच्या जाहिरात आणि विपणन विभागाचे प्रमुख किरण दीक्षित यांनी म्हटले आहे. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध या कंपनीची २० शहरांमध्ये २६ दालने आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 12:28 pm

Web Title: tbz launch purchasing gift card on festive occasion
Next Stories
1 अर्थसमस्येवर अल्प व्याजदर उतारा नव्हे
2 रुपयाचे वास्तविक मूल्य ५९-६० दरम्यान : अर्थमंत्री
3 …तरी एफबी लाइक्स
Just Now!
X