18 September 2020

News Flash

टीसीएसला ७,३४० कोटींचा तिमाही नफा

टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) ७,३४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन

विश्लेषकांच्या पूर्वअंदाजापेक्षा सरस कामगिरी

मुंबई  : वित्तीय वर्षांच्या एप्रिल ते जून २०१८ या पहिल्या तिमाहीत देशातील सर्वात मोठय़ा सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी – टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) ७,३४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गतवर्षी जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५,९४५ कोटी रुपये होता, त्या तुलनेत तो यंदा २३.४ टक्क्यांनी वाढला आहे.

टाटा समूहाच्या एकंदर नफ्यात सिंहाचा वाटा असलेल्या या कंपनीने तिमाहीत ३४,२६१ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. जो गेल्या वर्षी याच तिमाहीअखेर २९,५८४ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत १५.८ टक्के अधिक आहे. आधीच्या म्हणजे मार्च २०१८ तिमाहीअखेर टीसीएसचा निव्वळ नफा आणि महसूल अनुक्रमे ६,९०४ कोटी रुपये आणि ३२,०७५ कोटी रुपये असा होता. तिमाहीगणिक वाढीची ही कामगिरी अनेक विश्लेषकांच्या पूर्व-भाकितांपेक्षा किती तरी अधिक चांगली राहिली आहे.

तिमाही वित्तीय कामगिरीचे हे निकाल जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, टीसीएसचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले, ‘नवीन आर्थिक वर्षांची आम्ही दमदारपणे सुरुवात केली आहे आणि कंपनीसाठी येणारा भविष्यकाळ अतिशय चांगला आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातून मागणीत वाढीचे प्रारंभिक संकेत मिळत असल्याचे मागील तिमाहीत आम्ही सूचित केले होते. या संकेतांना संधीत बदलून त्यांचे भांडवल आम्हाला करता आले, हे या तिमाही निकालांद्वारे स्पष्ट होते.’’ क्लाऊड परिवर्तन, सायबर सुरक्षा, माहितीची गोपनीयता आणि स्वयंचलितीकरण अशा डिजिटल आघाडीवर कामांसाठी सशक्त मागणी येणे दृष्टिपथात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भागधारकांना ४ रुपयांचा अंतरिम लाभांश

टीसीएसने एक रुपया दर्शनी मू्ल्याच्या प्रत्येक समभागामागे ४ रुपयांचा अंतरिम लाभांश घोषित केला आहे. कंपनीने अलीकडेच भागधारकांकडील समभागांची पुनर्खरेदी (बाय-बॅक) योजनाही जाहीर केली आहे. प्रत्येकी २,१०० रुपये किमतीला होणाऱ्या या पुनर्खरेदी योजनेवर कंपनी १६,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. तथापि अद्याप या पुनर्खरेदीचे योजनेचे वेळापत्रक कंपनीकडून आलेले नाही. भांडवली बाजारातील व्यवहार संपुष्टात आल्यानंतर, टीसीएसने या तिमाही कामगिरीची घोषणा केली. या निकालाच्या प्रतीक्षेत टीसीएसचा समभाग ०.५६ टक्के घसरणीसह १,८७७ रुपयांवर मंगळवारी व्यवहार संपताना स्थिरावलेला दिसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:22 am

Web Title: tcs gets first quarterly profit of rs 7340 crore
Next Stories
1 भारतीय व्यावसायिक निर्णयकर्त्यांचा डेटा कौशल्यावर सर्वाधिक विश्वास
2 पॉलिसी बझारडॉटकॉम २,५०० रोजगार निर्माण करणार
3 नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटचा विशेष अभ्यासक्रम
Just Now!
X