नावीन्याची कास धरत भारतीय वस्त्र-तंत्रज्ञान उद्योग येत्या पाच वर्षांत वार्षिक २० टक्के दराने वाढून ३० अब्ज डॉलरचा होईल, असा विश्वास वस्त्रोद्योग आयुक्त किरण सोनी गुप्ता यांनी येथे व्यक्त केला. मुंबईत भरविण्यात आलेल्या ‘टेकटेक्सटाईल इंडिया’ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना त्यांनी केले. जर्मनीचे मुंबईतील राजदूत मिशेल सिबर्ट व मे फ्रँकफर्ट ट्रेड फेअर्स इंडियाचे संचालक राज मानेक यावेळी उपस्थित होते. जगभरातील १५० कंपन्यांचा सहभाग असलेल्या प्रदर्शनाची यंदाची ही पाचवी आवृत्ती येत्या शनिवापर्यंत गोरेगाव (पूर्व) येथील ‘बीसीई’मध्ये सुरू राहील. वाहन, आरोग्यनिगा क्षेत्रात तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादने वापरात येतात.