जे चपळ आहेत त्यांच्यासाठी हे नवयुग गतिमंदापेक्षा अधिक फायद्याचे आहे. देयक क्षेत्राकडे नजर वळवून पाहिली तर तेथे किती वेगाने संक्रमण सुरू असल्याचे लक्षात येईल. यापुढे धनादेश, ड्राफ्ट हे कागदी घोडे लवकरच कालबा ठरतील. पशांचे आदानप्रदान डिजिटल स्वरूपात अधिक सुरक्षित व त्वरेने होताना आताशीच आपण पाहात आहोत. सद्य युगात तंत्रज्ञानात्मक फेरबदल निरंतर घडतच असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विसाव्या शतकाची पायाभरणीच मुळी तंत्रज्ञानाधारीत नाविन्यतेकडून रचली गेली आहे. नव्या डिजिटल युगात दूरगामी बदलांचा झपाटा सर्वच क्षेत्र आणि व्यवसायात आपण अनुभवत आहोत. बाजारपेठेची नवीन व्याख्या बनविली गेली आहे. अनेक परंपरागत व्यवसाय अस्तंगत झाले तर ती जागा नव्या व्यवसायांकडून व्यापली गेली आहे. अन्यत्र नव्या तंत्रज्ञानातून काही रचनात्मक परिवर्तन आले असेल, तर वित्तीय सेवा क्षेत्रात त्यायोगे मन्वंतर घडू पाहत आहे.
या नवीन परिवर्तनातून घडणाऱ्या उलथापालथीचा एक सुस्पष्ट संकेत नोव्हेंबर २०१५ मध्ये फेसबुकच्या बाजार भांडवलाने २७५ अब्ज अमेरिकी डॉलरपल्याड मजल मारली तेव्हा आपण अनुभवले. भांडवली बाजारात सूचिबद्धतेनंतर अवघ्या तीन वर्षांत फेसबुकने २७३ अब्ज डॉलर बाजार भांडवल असलेल्या महाबलाढय़ जनरल इलेक्ट्रिकला (जीई) मात देण्याची किमया साधली. जरी फेसबुकच्या पटावरील कर्मचारी संख्या अवघी ९,००० म्हणजे जीईच्या एकूण मनुष्यबळाच्या तीन टक्क्यांइतकीही नसली आणि फेसबुकचा १२.५ अब्ज डॉलरचा महसूल हा जीईच्या एकूण महसुलाच्या एक-दशांशही नसला तरी हे असे घडले आहे!
तंत्रज्ञान हे नव्याचे सर्जन असले तरी ते अनेक गोष्टींच्या लोपातून घडत असते. सुदैवाने वित्तीय सेवा क्षेत्रात तंत्रज्ञानापायी वाहत असलेल्या बदलाच्या वारयात या उलथापालथीची तीव्रता तुलनेने खूप कमी आहे याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र एक गोष्ट स्पष्टच आहे, जे चपळ आहेत त्यांच्यासाठी हे नवयुग गतिमंदापेक्षा अधिक फायद्याचे आहे. देयक क्षेत्राकडे नजर वळवून पाहिली तर तेथे किती वेगाने संक्रमण सुरू असल्याचे लक्षात येईल.
यापुढे धनादेश, ड्राफ्ट हे कागदी घोडे लवकरच कालबा ठरतील. पशांचे आदानप्रदान डिजिटल स्वरूपात अधिक सुरक्षित व त्वरेने होताना आताशीच आपण पाहात आहोत.
तंत्रज्ञानाचे दोन महत्त्वाचे वास्तव आहेत. ते सतत उत्क्रांत होत राहते आणि समाजाकडून अधिकाधिक स्वीकारली जाऊन अखेर सर्वश्रुत व किफायती बनते. या प्रक्रियेत ते प्रचंड मोठा माहिती संचय करीत जात असते. या माहिती साठय़ांचे विश्लेषणातून कंपन्यांसाठी नव्या संधींचा उलगडा उत्तरोत्तर होत असतो.
या ठिकाणी स्पर्धा केवळ त्या त्या उद्योगक्षेत्रापुरतीच मग उरत नाही, तर एकमेकांपासून कैक योजने दूर असलेल्या उद्योगक्षेत्रातील कंपन्या ग्राहकांसंबंधी विस्तृत माहिती आणि अंतरंगाचा वापर करून नव्या क्षेत्रात विस्तार पावत असतात.
उदाहरण म्हणून तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या विद्यमान व्यासपीठाला थोडे वळण देऊन, त्यांच्याकडे उपलब्ध माहितीस्रोतातून वित्तीय सेवांच्या प्रांगणात सहज प्रवेश करू शकतात. प्रचंड मोठा ग्राहकवर्ग लाभलेल्या आणि त्या ग्राहकांच्या आवडीनिवडीबाबत व्यापक जाण असलेल्या कंपन्या मग त्या ग्राहकाला विविधांगी उत्पादनांची प्रस्तुती अगदी वित्तीय सेवाही प्रदान करू शकतात.
जलद तंत्रज्ञानात्मक प्रगतीने नवनव्या संधींचे दालन खुले करताना, कंपन्यांना नव्या ग्राहकांपर्यंत अल्पखर्चात पोहोचण्याची मुभा दिली असली, तरी वित्तीय सेवा क्षेत्रात सध्या कार्यरत स्पर्धकांसाठी ही धोक्याची घंटा जरूर आहे, कारण नव्यांना प्रवेशासाठी असणारे अडथळेच विरून गेले आहेत.
एका बाजूला, व्यापक माहितीचा खुला स्रोत जरी असला तरी वित्तीय सेवा आस्थापनांतील प्रक्रिया आणि आकृतीबंधात, तत्क्षणी वापरावयाची बुद्धीमत्ता आणि सुरक्षित प्रणालीशी तिचा गुंता होणार नाही, हे पाहावे लागेल. तर दुसऱ्या बाजूला नव्या करकरीत नोटा देणारे एटीएम केंद्र हे पुढे जाऊन सर्व प्रकारच्या गुंतवणुका, विमा हप्त्यांचे संकलन आणि देयकांच्या भरणा करण्याचे एकछत्र ठिकाण बनेल. आज कल्पनाही करता येणार अशा विपुल आणि अथांग शक्यता आहेत.
वित्तीय सेवा क्षेत्रातील अग्रणी या नात्याने व्यवसायवृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणारया आस्थापनेला आपण केवळ एक प्रश्न करायचा – ‘पुढे काय?’ या अत्यंत आकर्षक तरीही विध्वंसक गुण असलेल्या युगाचे बदल हेच व्यवच्छेदक लक्षण आहे आणि तंत्रज्ञान हाच नव्याचे सर्जन आणि फेरघडणीची हाळी देणारा स्वर असेल. वित्तीय सेवा या बदलापासून वेगळ्या नाहीत.
ग्राहकांना त्यांचे व्यवहार वेगाने, कमी खर्चात, सोयीस्कररीत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत सुरक्षित वातावरणात घडताना पाहायचे आहेत.
वर्ष २०२० मध्ये भारतीयाचे सरासरी वयोमान हे २९ वष्रे असेल. वित्तीय सेवा क्षेत्रातील आस्थापनांना मग या तंत्रज्ञान जाणकार आणि आकांक्षापूर्ण पिढीसाठी सेवेचे नवे आवर्तन आवश्यकच ठरेल. आजच्या घडीला शहरी आणि ग्रामीण भारतातही मोबाईल फोन हे सर्वापाशी असणारे एक सामाईक साधन आहे, म्हणूनच मग इंटरनेट आणि हँडहेल्ड उपकरणाचे संमिश्रण हे वित्तीय सेवांचे प्रमुख आधार आज बनले आहे. पुढे जाऊन हेच ओळख पटविण्याचे, मूल्यांकन आणि सेवा वितरणाचे प्रमुख साधन बनेल.
त्याचवेळी डिजिटल तंत्रज्ञान हे ग्राहकांना एका वित्तीय सेवा पुरवठादाराकडून दुसरयाकडे सहजपणे वळण्याचे साधन असेल. पहिल्याच्या नफाक्षमतेला त्यातून नुकसान सोसावे लागेल. म्हणूनच मग केवळ नव्या छोटय़ा आस्थापनांनाच नव्हे बडय़ा प्रस्थापितांनाही ग्राहकांच्या गरजा व मागणी ध्यानात घेऊन सतत नव्याचा स्वीकार करीत, परिस्थितीशी जुळवून घेत आहे त्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवीन धोरणाचा तंत्रज्ञानात्मक परिवर्तनाच्या पाश्र्वभूमीवर अवलंब आवश्यक ठरेल.
शिवाय, वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांना ग्राहकांसाठी नवीन वितरण प्रणाली आणि ग्राहकोपयोगी उपाययोजनांसाठी तंत्रज्ञान कंपन्यांचे सहाय्य मिळविणे क्रमप्राप्त ठरेल.
‘डोळ्याची पापणी लवली आणि तुमची संधी हुकली’ अशा धाटणीच्या सद्य युगात तंत्रज्ञानात्मक फेरबदल निरंतर घडतच असतात, या नव्या घडामोडींशी सुसंगत असणे केवळ उपयोगाचे ठरणार नाही.
गरज आहे ती या बदलांच्या एक पाऊल पुढे राहण्याची आणि आगामी तंत्रज्ञानात्मक लाटेवर स्वार होण्याची. अन्यथा उफाण आलेल्या महासागरात हरवून जाण्याचा धोका अटळ!
अजय श्रीनिवासन
लेखक आदित्य बिर्ला समूहाचे (वित्तीय सेवा) मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technology is transforming finance sector
First published on: 20-04-2016 at 03:34 IST