News Flash

दागिने खरेदीसाठीही आता वाढता तंत्रस्नेही कल

दरवर्षीच्या मानाने यंदाच्या वर्षी तंत्रस्नेही मंचावरून मौल्यवान धातूसाठीच्या नोंदणीला प्रतिसाद मिळाला.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर माफक सोने प्रतिसाद

मुंबई : करोना साथ प्रसारामुळे लागू टाळेबंदी दरम्यान ठप्प असलेल्या सराफ पेढ्यांमुळे मौल्यवान धातूच्या मुहूर्ताची अक्षय्य खरेदीहौस शुक्रवारी ग्राहकांना तंत्रस्नेही मंचाद्वारे भागवावी लागली. येणाºया कालावधीतही हा कल वाढण्याची शक्यता असून मुहूर्ताला सोन्यासाठी नोंदणी करून प्रत्यक्षात नंतरच्या कालावधीत खरेदीची मानसिकता रुजू पाहत आहे.

साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शुक्रवारच्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त टाळेबंदीच्या फेºयात अडकल्याने तमाम खरेदीदारांसह व्यापाºयांमध्येही निराशा आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गुढीपाडवा तसेच अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त या क्षेत्रासाठी निराशाजनक राहिला. परिणामी माफक दर असूनही वर्ष २०१९ मधील अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत शुक्रवारी १० टक्केच मौल्यवान धातू विक्री झाल्याचे सांगण्यात येते. तंत्रस्नेही माध्यमातूनही एरवीच्या २५ ते ३० टनच्या तुलनेत यंदा ३ ते ४ टनच मौल्यवान धातूचा व्यवसाय नोंदला जात असल्याचे मानले जाते.

 

दरवर्षीच्या मानाने यंदाच्या वर्षी तंत्रस्नेही मंचावरून मौल्यवान धातूसाठीच्या नोंदणीला प्रतिसाद मिळाला. अर्थात असे व्यवहार हे केवळ चोख सोने धातूसाठीच होऊ शकले. शुक्रवारच्या मुहूर्ताला नोंदणी केलेल्या दरांमध्ये दागिने खरेदीची प्रत्यक्षात दुकाने सुरू झाल्यावर ग्राहकांना संधी आहे. येथून पुढेसुद्धा कमी किमतीचे दागिने याच माध्यमातून विकली जाऊ शकेल. मात्र, जास्त किमतीचे दागिने मात्र थेट दुकानात येऊन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असेल. संधी जाऊ नये म्हणून ग्राहक तंत्रस्नेही माध्यमातून सोन्यासाठीची किंमत निश्चित करून ठेवतात व त्याचे प्रमाण नजीकच्या दिवसांमध्ये वाढू शकते. एरवीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला वर्षातून एकूण विक्रीच्या २ ते ३ टक्के विक्री होत असते. – अजित गाडगीळ, संचालक, पीएनजी सन्स.

सोने, चांदीसारख्यामौल्यवान धातूच्या दरात खरेदी मुहूर्ताला शुक्रवारी काही प्रमाणात वाढ  नोंदली गेली. मुंबईत चांदीचा किलोचा दर ७०,३६० तर सोन्याचा भाव तोळ्यासाठी ४७,५६६ ते ४७,७५७ रुपये होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 12:02 am

Web Title: there growing trend towards buying jewelery now akp 94
Next Stories
1 ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या संचालक मंडळावर हृषिकेश मोडक
2 ‘गो फर्स्ट’कडून ३,६०० कोटींचा समभाग विक्रीचा प्रस्ताव
3 सय्यद जाफरी ‘अ‍ॅक्ट्रेक’चे प्रशासकीय प्रमुख
Just Now!
X