29 May 2020

News Flash

‘लार्ज, मिड कॅप’ गुंतवणुकीची हीच ती वेळ!

फंड गुंतवणुकीतील पूर्व निश्चित नियम निधी व्यवस्थापकाला गुंतवणुकीतील लवचिकता प्रदान करतात.

 

|| जतिंदर पाल सिंग

बाजारातील मागील आधारसामुग्रीच्या (डेटा पॉइंट) आधारे आम्हाला असे आढळले की, कोणतेही एक उद्योग क्षेत्र किंवा भांडवली बाजार सातत्याने अव्वल कामगिरी करीत नाही.

२०१८ मध्ये निफ्टी निर्देशांकाची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. २०१७ मध्ये स्मॉल कंपनी गुंतवणूकदारांच्या पदरात भरभरून परतावा टाकला २०१६ मध्ये मिड कॅप निर्देशांक सर्वाधिक परतावा दिलेला निर्देशांक होता. एखाद्या विशिष्ट वेळी वेळेत गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या प्रकारचे समभाग सर्वोत्तम आहेत हे ओळखण्याचे कौशल्य गुंतवणूकदारांकडे नसते.

फंड गुंतवणुकीतील पूर्व निश्चित नियम निधी व्यवस्थापकाला गुंतवणुकीतील लवचिकता प्रदान करतात. निधी व्यवस्थापक जोखीम-परताव्यानुसार गुंतवणुकीची संधीचा विचार करून त्याच्या आधारावर मालमत्ता विभाजन करतात. यामुळे गुंतवणूकदारास एका योजनेतून दुसऱ्या योजनेत न जाता भांडवली नफ्याचा भाग होण्याचा फायदा मिळतो. एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी या नात्याने आम्हाला अशी उत्पादने सादर करायची आहेत. जी गुंतवणूकदारांच्या गरजांशी संबंधित असतील.

आमचे सर्व इक्विटी फंड ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल व्हॅल्यू’ या गुंतवणुकीच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करतात याचा अर्थ सध्याच्या समभागांच्या किंमतीपेक्षा शाश्वत मूल्य जेव्हा अधिक असते, तेव्हा ती गुंतवणुक अधिक  सुरक्षित असते. जेणेकरून गुंतवणूकदारांसाठी दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्यासाठी वाव राहील.

समभाग गुंतवणूकींपैकी किमान ८० टक्के समभागांच्या ‘गाभा’ पद्धतीच्या म्हणजे दीर्घकाल गुंतवणुकीत राखून ठेवण्याच्या  प्रकारातील असतात. या कंपन्या आपापल्या क्षेत्रात स्पर्धात्मक फायदे असलेले मजबूत आणि टिकाऊ व्यवसायात आहेत.

उर्वरीत २० टक्के कंपन्या या ‘सामरिक गुंतवणूक’ प्रकारातील म्हणजे ज्यांचे भाव भविष्यात लक्षणीयरित्या वर जायची शक्यता असणाऱ्या परंतु व्यवसायात तात्पुरती समस्या असलेल्या आणि यामुळे सध्या कमी भाव असलेल्या असतात. अंतर्निहित व्यवसायाच्या ‘गुणवत्तता’ आणि ‘किंमतीतील सुरक्षितता अर्थात आम्ही त्या व्यवसायासाठी आपण जी किंमत किंवा मूल्यांकन देत आहोत. दोन्हीवर आम्ही लक्ष केंद्रित करतो. आम्ही दोघांनाही तितकेच महत्त्व देतो जे आम्हाला वाटते गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा एक नितळ अनुभव मिळेल.

आमचे लक्ष गुणवत्ता समभागांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना वाजवी परतावा देणे हे आहे.

आमचे गुंतवणूक तत्त्वज्ञान (ग्रोथ अ यॉर्कनेबल प्राइस – जीएआरपी) आहे. म्हणून जेव्हा आम्ही भविष्यात चांगला वृद्धीदर  राखण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांना लक्ष्य करतो, आर्थिक आणि वित्तीय घडामोडींमुळे बाधित झालेल्या परंतु आम्ही भविष्यातील लाभार्थी उद्योग क्षेत्रांवर किंवा त्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांवरही आमचे लक्ष असते.

जेव्हा अडचणींचा काळ संपून उत्सर्जनात वाढ होण्याची शक्यता असते तेव्हा गुंतवणूक तत्वज्ञानच्या चौकटीत आवश्यक मूल्यांकन प्रदान करणाऱ्या कंपन्यांचे विश्लेषण करून गुंतवणूक योग्य वाटल्यास त्यांचा गुंतवणुकीत समावेश होतो.

तुम्ही किमान ३ वर्षे गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या फंडाच्या श्रेणीचा शोध घेत असाल तर सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीमध्ये लार्ज आणि मिड – कॅप फंड श्रेणी चांगली निवड होऊ  शकते. आमच्या संशोधन अहवालात असे दिसून आले आहे की लार्ज कॅप आणि मिड कॅप समभागांचे मूल्यांकन या टप्प्यावर वाजवी असून गुंतवणुकीच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.

लार्ज कॅप समभागांसाठी किंमत/वाजवी मूल्य गुणोत्तर ०.९५ ते १.२० दरम्यान आहेत तर मिड – कॅप समभागांसाठी ०.८५ ते १.१०५ दरम्यान आह. हा गुणोत्तर पट्टा पाच वर्षांंपूर्वी होता.

जेव्हा गुणोत्तर पट्टा १ च्या खाली किंमत/वाजवी मूल्याचे प्रमाण सूचित करते की समभाग योग्य आदर्श मूल्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. तर एकाहून अधिक गुणोत्तर असे सूचित करते की ते त्याच्या न्यायी मूल्याच्या समभागाचे अधिमुल्यावर व्यवहार होत आहेत.

लार्ज अँड मिडकॅप फंड’ आपल्या एकूण फंडाच्या कमीतकमी ३५ टक्के लार्ज कॅप समभागात आणि ३५  टक्के मिड कॅप समभागात गुंतवणूक करतात. उर्वरित ३० टक्के गुंतवणूक बाजारातील परिस्थितीच्या आधारावर आणि निधी व्यवस्थापकाच्या कौशल्यावर मालमत्तेचे वाटप केले जाते. सध्याची परिस्थिती म्हणूनच लार्ज आणि मिड कॅप प्रकारच्या फंडात गुंतवणूक करण्यास आदर्श म्हणावी लागेल.

लेखक महिंद्र म्युच्युअल फंडचे विक्रीप्रमुख आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:25 am

Web Title: this is the time to invest in big mid cap akp 94
Next Stories
1 निर्देशांकांचा संमिश्र सप्ताहारंभ
2 वाहन विक्रीवाढीने पाठ सोडली
3 व्याजदर निर्णयासाठी आजपासून बैठक
Just Now!
X