डॉलरच्या समोर सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदविताना स्थानिक चलन आता गेल्या तीन आठवडय़ांच्या नीचांक स्तरात आले आहे. रुपयाने गुरुवारच्या सत्रात परकी विनियम व्यासपीठावर २० पैशांपर्यंत आपटी नोंदवीत चिंता निर्माण केली. दिवसअखेर १९ पैशांनी घसरत रुपया ६३.७७ या गेल्या तीन आठवडय़ांतील तळात विसावला. यापूर्वी २९ जून रोजी चलन ६३.८४ या पातळीवर होते. गेल्या सलग दोन सत्रात त्यात २२ पैशांची घसरण राहिली आहे.