बहुराज्यीय, नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या नालासोपारा, विरार आणि पालघर येथील शाखांचे उद्घाटन नुकतेच झाले. बँकेच्या अनुक्रमे ११३, ११४ व ११५ शाखेचा शुभारंभ झाला. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या टीजेएसबी बँकेच्या एकूण शाखांची संख्या आता ११५ झाली आहे. सदर सर्व शाखांतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकसेवा दिली जाते.
नालासोपारा येथील शाखेचे उद्घाटन संचालक योगेश कनाणी आणि व्यवस्थापकीय संचालक – मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश उतेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी स्वाती कळके आणि विनायक नवरे उपस्थित होते.
विरार येथील शाखेचे उद्घाटन उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक दिलीप सुळे, संचालक प्रा. नामदेव मांडगे आणि वरिष्ठ अधिकारी सतिश कोरान्ने उपस्थित होते.
पालघर येथील शाखेचे उद्घाटन अध्यक्ष सी. नंदगोपाळ मेनन यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक रमाकांत अग्रवाल, संचालक मधुकर खुताडे आणि मुख्य सरव्यवस्थापक सुनिल साठे उपस्थित होते.
या तीनही शाखांच्या उद्घाटन समारंभाला स्थानिकांनी प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी बचत खाती आणि चालू खाती मोठय़ा संख्येने उघडली गेली. टीजेएसबीसारख्या अद्ययावत बँकेच्या शाखेचे परिसरातील सर्वस्तरातील नागरिकांनी स्वागत केले.
टीजेएसबी सहकारी बँक मार्च २०१६ अखेर रुपये १३,००० कोटींचा एकूण व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सध्या बँकेच्या ठेवी ८,००० कोटी रुपये असून कर्ज ४,६०० कोटी रुपये आहेत. बँकेचा परकी चलन व्यवसाय वाढता असून या अंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा बँक देत आहे. बँकेचा हा व्यवसाय १,३०० कोटी रुपये आहे. बँकेला कायमस्वरुपी एडी – वन परवाना प्राप्त झाला आहे. टीजेएसबीच्या भरभक्कम आíथक वृध्दीतील सातत्यामुळे हा परवाना मिळाला आहे, असा दावा करण्यात आला. एसएमई, रिटेल या क्षेत्रांसह मायक्रो फायनािन्सगवर बँकेचे विशेष लक्ष आहे. लेखा परिक्षणाचा ऑडिटचा अ वर्ग सातत्याने टीजेएसबीने राखला आहे. क्रिसिल या रेटींग संस्थेकडून टीजेएसबीचे मानांकन पहिले राहिले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार टीजेएसबी ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधींची नियुक्ती करणार आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेत बँक सहभागी असून या माध्यमातून बँकांच्या सर्व शाखांतून गरजूंना कर्ज वितरण होत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना बँकेच्या माध्यमातून लाभार्थीपर्यंत पोहचवल्या जात आहेत. इंटरनेट, मोबाईल बँकिंग, ईलॉबी, डिजिटलायझेसन, मनी ट्रान्सफर, बहुउपयोगी एटीएम कार्ड, रुपे कार्ड यातून स्मार्ट बँकिंग कार्यान्वित झाले आहे. केवळ एका क्लिकवर बँकेच्या सेवा उपलब्ध आहेत. बँकेने मोबाईल बँकिंग उपलब्ध करुन देताना विविध प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेर्सशी भागीदारी केली आहे. टीजेएसबीतर्फे ग्राहकोपयोगी विम्याची सेवा दिली जाते. विमा व्यवसायातही टीजेएसबी आघाडीवर आहे.