देशातील अब्जाधीशांकडे असलेल्या एकूण संपत्तीत निम्मा वाटा मुकेश अंबानींसह आघाडीच्या पाच उद्योजकांच्या ताब्यात आहे. या पाच जणांची एकत्रित संपत्ती ८५.५ अब्ज डॉलर आहे.
भारतीय अब्जाधीशांमध्ये अर्थातच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे २४.४ अब्ज डॉलरसह सर्वात आघाडीवर आहेत. ‘वेल्थ-एक्स’ने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. देशातील श्रीमंतांकडे (अब्जपती) असलेल्या एकूण संपत्तीपैकी पहिल्या पाच उद्योजकांकडे असलेली भारतीय चलनातील रक्कम ही ५,२३,८९७ कोटी रुपये आहे. त्यापैकी अंबानी यांची संपत्ती १,४९,४७४ कोटी रुपये आहे.