News Flash

‘सिबिल’वर ट्रान्सयुनियनचे वर्चस्व

जागतिक पत आणि माहिती सेवा कंपनी असलेल्या ट्रान्सयुनियनने देशातील आघाडीच्या पत माहिती कंपनी सिबिलमधील आपला हिस्सा ७.५ टक्क्यांनी वाढवत तो थेट ५५ टक्क्यांवर नेऊन ठेवला

| May 24, 2014 12:40 pm

जागतिक पत आणि माहिती सेवा कंपनी असलेल्या ट्रान्सयुनियनने देशातील आघाडीच्या पत माहिती कंपनी सिबिलमधील आपला हिस्सा ७.५ टक्क्यांनी वाढवत तो थेट ५५ टक्क्यांवर नेऊन ठेवला आहे. सिबिलमधून बाहेर पडताना स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक आणि सुंदरम फायनान्स या दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे ५ व २.५ टक्के हिस्सा याद्वारे विकला आहे. सिबिलमध्ये उर्वरित बँकांची हिस्सेदारी कायम आहे. मूळची अमेरिकी ट्रान्सयूनियन ही सिबिलबरोबर २००१ पासून भारतीय पत माहिती व्यवसायात कार्यरत आहे. या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा ७४ टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर ट्रान्सयुनियनचे सिबिलवर वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे मानले जात आहे.
मास्टर कार्डचा ‘इलेक्ट्रा कार्ड’वर ताबा
मुंबई: तूर्त किरकोळ हिस्सा असलेल्या पुणेस्थित इलेक्ट्रा कार्ड सव्‍‌र्हिेससवर ताबा मिळविण्याची अमेरिकेच्या मास्टर कार्डची मनीषा अखेर पूर्ण झाली आहे. मास्टर कार्डने यासाठी इलेक्ट्रा कार्डची मुख्य प्रवर्तक ऑप्स सॉफ्टवेअर सोल्युशनबरोबर करार केला आहे. इलेक्ट्रा कार्ड ही इलेक्ट्रिक व कार्ड देय प्रक्रिया सेवा तसेच सॉफ्टवेअर सोल्युशन क्षेत्रातील कंपनी आहे. जागतिक स्तरावर २५ देशांमध्ये तिचे ग्राहक आहेत. मास्टर कार्डने २०१०च्या सुरुवातीला इलेक्ट्रा कार्डमध्ये किरकोळ हिस्सेदारी केली होती. आता नवा व्यवहार २०१४ च्या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होणार आहे.
सूत निर्यातीचे लक्ष्य यंदा गाठले जाईल
मुंबई: सूती वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद (टेक्सप्रोसिल)ने केलेल्या ताज्या पाहणीनुसार, कच्चा माल म्हणून वापरलेल्या कापसाच्या किमतीतील चढ-उतार दिसून आले तरी भारतातून सूत निर्यात लक्ष्य गाठू शकेल, असा अंदाज वर्तविला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतातील सूतगिरण्यांकडे नोंदविल्या गेलेल्या ठोस मागण्या पाहता, २०१३-१४ या आर्थिक वर्षांत सूत निर्यात १,३५० दशलक्ष किलोग्रॅम हे निर्धारित लक्ष्य गाठू शकेल, असा टेक्सप्रोसिलचा कयास आहे. या निर्यातीचे मूल्य पावणेपाच अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात जाणारे असेल.
टेक्सप्रोसिलकडे उपलब्ध पहिल्या १० महिन्यांच्या (एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४) आकडय़ांनुसार, देशातून १,०८२ दशलक्ष किलोग्रॅम म्हणजे ३.७५ अब्ज डॉलरची सूत निर्यात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 12:40 pm

Web Title: transunion acquires majority stake in cibil
Next Stories
1 मिन्त्रा फ्लिपकार्टच्या झोळीत!
2 सुवर्ण पहाट
3 शेअर बाजारात सराफा समभागांचे फावले
Just Now!
X