गेल्या काही वर्षांत प्रवासाने आवड व छंद म्हणून महत्त्व मिळवले आहे. वाढते उत्पन्न आणि वाढत्या आकांक्षा, यामुळे कुटुंबे प्रवासाकडे केवळ मजा म्हणून न पाहता खास अनुभवासाठी केलेली गुंतवणूक म्हणून पाहू लागली आहेत.
टिअर १ (प्रमुख) शहरात राहत असलेल्या कुटुंबांसाठी हे दरवर्षीची योजना झाली आहे. पूर्वी, कधीतरी एकदा प्रवासाचा बेत आखला जायचा. सध्या अनेक ट्रॅव्हल कंपन्या उदयास येत असून त्यामुळे केवळ प्रवासाची इच्छा असलेल्यांना त्यांना हवे तसे (कस्टमाइज्ड ग्रुप ट्रॅव्हल प्लॅन) करून देत आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेला गती  येत असल्याने व्यवसायाच्या कामानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याचे कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात वर्षभर सातत्य दिसून येते.
प्रवास करण्याच्या गरजेमुळे विविध साधने विकसित होण्यास चालना मिळाली असून, त्यामुळे संपूर्ण प्रवासाचा अनुभव उत्तम होण्यास मदत झाली आहे. यापकी काही म्हणजे, ग्राहकांच्या गरजांनुसार प्रवासाची रूपरेषा आखणारे ट्रॅव्हल अ‍ॅप्स, एखाद्या ठिकाणाभोवतीची, तसेच होमस्टे/हॉटेलांची माहिती प्रवाशांना देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शन करणारया वेबसाइट.
प्रवासी एखाद्या अनोळखी देशात ज्या प्रकारे संवाद साधतात व फिरतात त्यामध्ये त्यांना अधिकाधिक सोय अपेक्षित असल्याने त्यांच्या आवडी-निवडी बदलत आहेत. हे सर्व स्थानिक चलनाशिवाय अशक्य आहे. अलीकडेच लोकप्रियता मिळवलेली ’ट्रॅव्हल कार्डस’ अनेक कारणांमुळे स्थानिक चलन बाळगण्यावर ठोस उपाय ठरत आहेत.
त्याची कारणे पुढील आहेत :
ट्रॅव्हल कार्डस आíथकदृष्टय़ा सोयीची ठरतात : बँका देत असलेली ’ट्रॅव्हल कार्डस’ प्री-पेड कार्ड असतात. त्यामध्ये संबंधित ठिकाणचे चलन सध्याच्या विनिमय दराने भरून घेता येते आणि खरेदी, जेवणखाण यासाठी, तसेच परदेशात पसे काढण्यासाठी र्मचट पॉइंट-ऑफ-सेल येथे थेट वापरता येते. ट्रॅव्हलर्स चेकची घटती लोकप्रियता आणि रोख रक्कम गमावण्याचा धोका यामुळे ट्रॅव्हल कार्ड वापरणे योग्य ठरू शकते. ट्रिप पूर्ण झाली की, खर्च न केलेली रक्कम परत मागता येते आणि तेच कार्ड आणखी परदेशवारीसाठीही वापरता येते. विविध देशांमध्ये मोठा दौरा असेल तर मल्टि-करन्सी एक्स्चेंज कटकटीचे ठरते. अशा वेळी मल्टि-करन्सी ’ट्रॅव्हल कार्ड’ हा उत्तम पर्याय ठरतो. यामुळे विविध चलनांतील रक्कम एकाच कार्डामध्ये नेता येते.
सुरक्षितता : बँकेने पुरवलेले सेल्फ-केअर पोर्टल आणि अहोरात्र आंतरराष्ट्रीय टोल-फ्री क्रमांक यामार्फत कार्ड अकाउंटच्या ऑनलाइन वापरामुळे ग्राहकांना जमा रकमेची चौकशी, निधी हस्तांतर, हरवलेले कार्ड गोठविणे करणे यासाठी मदत मिळू शकते.  तसेच, एसएमएस/ईमेल अ‍ॅलर्टमुळे कार्डधारकांना त्यांच्या कार्डाशी संबंधित घटनांवर लक्ष ठेवता येऊ शकते आणि एखादा अनधिकृत व्यवहार आढळल्यास तातडीने कार्डाचा गरवापर टाळता येऊ शकतो. याबरोबरच, हरवलेल्या कार्डातील संपूर्ण रक्कम तातडीने रिप्लेसमेंट कार्डमध्ये जमा करता येऊ शकते. हे कार्ड प्राथमिक कार्डासोबत जारी केलेले असते. ’ट्रॅव्हल कार्डस’ आता चिप आणि पिन तंत्रज्ञानासह दिल्या जातात. यामुळे ही कार्डे अधिक सुरक्षित ठरतात.
अतिरिक्त लाभ समाविष्ट : ’ट्रॅव्हल कार्डस’ विविध प्रकारची विमाकवच देऊ करतात, जसे की, वैयक्तिक हवाई अपघात कवच (केवळ मृत्यूसाठी) आणि प्रवासाची कागदपत्रे हरवल्यास सहाय्य (व्हिसा व पासपोर्ट), लॉस्ट-कार्ड-लाएबिलिटी कवच. कार्डधारकांना प्रवास करत असताना त्यांचे कार्ड ऑनलाइन रीलोड करता येऊ शकते, रिवॉर्ड पॉइंट मिळवता येऊ शकतात आणि लीजर ट्रॅव्हलदरम्यान नक्कीच खरेदी केली जात असल्याने निवडक खरेदीवर कॅशबॅक मिळवता येते.
प्रवास हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. लोक प्रवासाकडे अधिक गांभिर्याने पाहू लागले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही प्रवासाला जाल तेव्हा सोबत ’ट्रॅव्हल कार्ड’ राहूदे. यामुळे तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळतील व सोय होईल. त्याकडून तुमचा अपेक्षाभंग कधीच होणार नाही.

जागतिक अर्थव्यवस्थेला गती  येत असल्याने व्यवसायाच्या कामानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याचे कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात वर्षभर सातत्य दिसून येते. प्रवास करण्याच्या गरजेमुळे विविध साधने विकसित होण्यास चालना मिळाली असून, त्यामुळे संपूर्ण प्रवासाचा अनुभव उत्तम होण्यास मदत झाली आहे. प्रवासी एखाद्या अनोळखी देशात ज्या प्रकारे संवाद साधतात व फिरतात त्यामध्ये त्यांना अधिकाधिक सोय अपेक्षित असल्याने त्यांच्या आवडी-निवडी बदलत आहेत.

(लेखक आयसीआयसीआय बँकेचे सरव्यवस्थापक (प्रमुख-कार्ड) आहेत.