News Flash

ऐशआरामी निवासी मालमत्तांची भारत ही सर्वात स्वस्त बाजारपेठ : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचे सम्राट आणि सौंदर्यस्पर्धाचे आयोजन ते टीव्हीवरील वावराने वलयांकित प्रतिमा लाभलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट विदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम कठोर असले

| August 13, 2014 03:59 am

अमेरिकेच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचे सम्राट आणि सौंदर्यस्पर्धाचे आयोजन ते टीव्हीवरील वावराने वलयांकित प्रतिमा लाभलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट विदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम कठोर असले तरी भारताबद्दल आपल्या खूपच आशा असल्याचे मंगळवारी मुंबईभेटीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अमेरिकेतील मॅनहॅटन इलाख्यात क्षितिज झाकोळणाऱ्या गगनचुंबी इमारतींचे विकासक असलेले ट्रम्प यांनी लोढा समूहासह भागीदारीने साकारलेल्या वरळी येथील ८०० फूट उंच आणि ७७ मजल्यांच्या ‘ट्रम्प टॉवर’ या निवासी मनोऱ्याचे अनावरण केले. त्यांची गुंतवणूकदार कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनने भागीदारीत उभारलेला हा दुसरा ट्रम्प मनोरा आहे.
लोकसभेच्या निवडणुकांनंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमुळे भारतातील गुंतवणुकीचा मानस कमालीचा बदलला असून आपणही येत्या काळात व्यक्तिगत क्षमतेत जास्तीतजास्त गुंतवणूक येथे करणार आहोत, असे त्यांनी नेमक्या गुंतवणुकीचे प्रमाण स्पष्ट न करता सांगितले. ‘आजच्या घडीला जगातील सर्वात स्वस्त ऐशआरामी मालमत्तांची बाजारपेठ’ असे भारताचे वर्णन करीत येत्या काळात ऐशआरामी निवासी तसेच हॉटेल्स मालमत्तांमध्ये गुंतवणुकीसाठी सुयोग्य भागीदारांच्या आपण शोधात असल्याचे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले.
आगामी गुंतवणुकीसाठी दिल्लीतील उच्च श्रेणीतील आलिशान निवासी क्षेत्रावर आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2014 3:59 am

Web Title: trump bullish on india to invest more in residential hospitality spaces
टॅग : Donald Trump
Next Stories
1 खाद्यान्न उद्योगासाठी नवीन उत्पादनांच्या प्रस्तुतीवर ‘कॅम्लिन फाइन सायन्सेस’चा भर
2 एनएसईएल प्रकरणात आणखी सात जणांना अटक
3 ‘एमईडीसी’द्वारे सूक्ष्म व लघुउद्योगांबाबत राष्ट्रीय परिषद सप्टेंबरमध्ये मुंबईत
Just Now!
X