News Flash

वार्षिक ३५% वाढीसह स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला दोन कोटींचा निव्वळ नफा

रत्नागिरी जिल्ह्यात पाच शाखा असलेल्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षांच्या सांगतेला म्हणजे ३१ मार्च रोजी सरलेल्या वर्षांचा आर्थिक ताळेबंद जाहीर करण्याच्या परंपरेला अनुसरून, यंदाही

| April 3, 2013 02:36 am

रत्नागिरी जिल्ह्यात पाच शाखा असलेल्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षांच्या सांगतेला म्हणजे ३१ मार्च रोजी सरलेल्या वर्षांचा आर्थिक ताळेबंद जाहीर करण्याच्या परंपरेला अनुसरून, यंदाही उमदी प्रगती दर्शविणारी वर्ष २०१२-१३ची कामगिरी जाहीर केली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत संस्थेच्या नफ्यात ३५.४८ टक्क्यांची वाढ होऊन, तो रु. २ कोटी १ लाख रुपये झाला आहे. आर्थिक वर्षांत संस्थेचे खेळते भांडवलही ३८.२२ टक्के वाढून ७१ कोटी ३९ लाख झाले असून, नफ्याचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण २.८१ टक्के असे लक्षणीय आहे.
उल्लेखनीय म्हणजे देशभरात वाणिज्य बँकांच्या कर्जवितरणाला ओहोटी लागली असताना, संस्थेने गतवर्षांच्या तुलनेत ४४.८० टक्के अधिक म्हणजे ६८.२२ लाखांचे कर्ज वितरण केले. तर सलग नवव्या वर्षी संस्थेच्या सर्व शाखांनी १०० टक्के कर्जवसुलीही साध्य केली. संस्थेच्या  ठेवींमध्ये ४३.९१टक्के अशी     विक्रमी वाढ होऊन त्या ६१.६६ कोटींवर गेल्या आहेत.
या दमदार कामगिरीतील अधिकारी, पिग्मी एजंट, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान ओळखून संस्थेने त्यांच्या वेतनात भरघोस वाढ एप्रिल २०१३ पासून लागू केली आहे, या वेतनवाढीचा एकत्रित खर्च वार्षिक ६२ लाखांचा घरात जाणारा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:36 am

Web Title: two crores profit to swami swaroopanand credit society
टॅग : Banking,Profit
Next Stories
1 स्टरलाइटचा तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्यास न्यायालयाची मनाई
2 अभ्युदय बँकेची मुख्यमंत्री दुष्काळ निधीस मदत
3 ‘पेटंट लढय़ा’त नोव्हार्टिस तोंडघशी!
Just Now!
X