मुंबई : सलग सुटय़ांना लागून येणाऱ्या व खातेदार, ग्राहकांकरिता व्यवहार विस्कळीत करू पाहणारा बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप अखेर रद्द झाला आहे.

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या संपामागील कारण असलेल्या मागण्यांबाबत अर्थसचिवांनी सहानुभूती दर्शविल्याने तो मागे घेण्यात आल्याचे बँक, अधिकारी कर्मचारी संघटनेने सोमवारी जाहीर केले.

चार प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजधानीत अर्थसचिव राजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी १० संभाव्य विलिनीकरण होत असलेल्या बँकांबाबत समिती नेमण्याचे आश्वास त्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले.

वेतन सुधारणा, पाच दिवसांचा पूर्ण आठवडा आदी मागण्यासाठी संघटनांनी संपासाठी हाक दिली होती. लागून येणाऱ्या सुट्टय़ां दरम्यान हा संप होणार होता.