25 September 2020

News Flash

कर्जबुडव्यांवर फास अधिक घट्ट;‘यूको बँक’चीही नोटीस सज्जता!

किंगफिशर एअरलाइन्सला कर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) म्हणून जाहीर करण्यासाठी आणखी एक बँक तयारी करत आहे. याबाबत नोटीस पाठविण्याची पडताळणी करत असल्याचे यूको बँकेने म्हटले आहे.

| September 20, 2014 04:02 am

किंगफिशर एअरलाइन्सला कर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) म्हणून जाहीर करण्यासाठी आणखी एक बँक तयारी करत आहे. याबाबत नोटीस पाठविण्याची पडताळणी करत असल्याचे यूको बँकेने म्हटले आहे.
यूको बँकेने किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाची रक्कम ४०० कोटी रुपये असल्याचे बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण कौल यांनी कोलकात्यात सांगितले. ‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) बँकिंग विषयावरील परिषदेस उपस्थित असलेल्या कौल यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
उड्डाणे बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्स व तिचे मालक विजय मल्या यांना यापूर्वी युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक व स्टेट बँकेने कर्जबुडवे जाहीर करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी पहिले पाऊल युनायटेड बँक ऑफ इंडियाने सर्वप्रथम टाकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 4:02 am

Web Title: uco bank weighing options to send notice to kfa
Next Stories
1 ‘केईपीएल’ने तयार केला पहिला स्वदेशी टर्बाइन!
2 तेजीवाल्यांची नंदीगर्जना
3 चीनशी व्यापार भागीदारीत भारतीय बँकांचीही हिस्सेदारी
Just Now!
X