News Flash

दुसऱ्या लाटेनं घेतला १ कोटी नोकऱ्यांचा घास; ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट

'सीएमआयई'च्या पाहणीतील धक्कादायक आकडेवारी... नोकरीच्या संधी आटल्या... देशातील पावणे दोन लाख कुटुंबाचं सर्वेक्षण...

'सीएमआयई'च्या पाहणीतील धक्कादायक आकडेवारी... नोकरीच्या संधी आटल्या...(संग्रहित छायाचित्र । इंडियन एक्स्प्रेस)

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंही अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय टाळला असला, तरी जवळपास सगळ्याच राज्यांनी कमी अधिक प्रमाणात निर्बंध लादले. याचा परिणाम अर्थचक्रावर झाला असून, करोनाच्या दुसऱ्या लाटेनं तब्बल १ कोटी नोकऱ्यांचा घास घेतला. इतकंच नाही, तर देशातील ९७ टक्के कुटुंबांचं उत्पन्नातही घट झाली आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेनं देशातील १ लाख ७५ हजार कुटुंबांची पाहणी केली. त्यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चे मुख्याधिकारी महेश व्यास यांनी पीटीआयशी बोलताना बेरोजगारीत झालेल्या वाढीबद्दल माहिती दिली. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने देशातील एक लाख ७५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण केलं. यात करोनाच्या पहिल्या लाटेनंतर ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाली असल्याची माहिती व्यास यांनी दिली.

पहिल्या लाटेत कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पहिल्या लाटेतून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट आली. यातही बेरोजगारी वाढली असल्याचं दिसून आलं आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चे व्यास याविषयी बोलताना म्हणाले की, देशात दुसऱ्या लाटेमुळे १ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दुसरी लाट हे मुख्य कारण असल्याचंही त्यांनी म्हटलं. लॉकडाउनमधून अर्थव्यवस्था खुली होत असतानाच लाट आली. त्यामुळे बेरोजगारीची समस्या पूर्णपणे सुटली नाही. गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२० मध्ये लॉकडाउनमुळे बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर पोहोचला होता. दुसरी लाट आल्यानंतर अनेक राज्यांनी निर्बंध लादले, त्याचा परिणाम थेट अर्थचक्रावर झाला आहे.

ज्या लोकांना नोकरी गमवाव्या लागलेल्या त्यांना पुन्हा नोकरी मिळवण्यात प्रचंड अडचणी येत आहे. असंघटित क्षेत्रात रोजगार निर्मिती सुरू झाली. मात्र संघटित आणि चांगल्या दर्जाच्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यात साधारणतः वर्षभराचा कालावधी तरी लागतो, असं व्यास यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 1:59 pm

Web Title: unemployment coronavirus second wave 10 million indians lost their jobs 97 per cent of households incomes declined cmie bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन आने वाले हैं’; ‘मूडीज’चा मोदी सरकारला दिलासा
2 India GDP : विकासदराचा नीचांक
3 ‘सीआयआय’ अध्यक्षपदी टी. व्ही. नरेंद्रन; हीरो मोटोकॉर्पचे पवन मुंजाल उपाध्यक्ष
Just Now!
X