14 October 2019

News Flash

अमेरिकेचा चिनी वस्तूंवर २०० अब्ज डॉलर कर

अमेरिकेद्वारे नवे व्यापार निबर्ंध लागू झाले असले तरी व्यापार चर्चा कायम ठेवण्याची तयारी चीनने दाखविली आहे

(संग्रहित छायाचित्र)

आशियातील कट्टर शत्रू असलेल्या चीनमधून उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंवर तब्बल २०० अब्ज डॉलरचे कर लादण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी रविवारी ट्विटद्वारे केली. नव्या र्निबधाची अंमलबजावणी गेल्या शुक्रवारपासूनच करण्यात येत असल्याचेही जाहीर करण्यात आले.

अमेरिकेद्वारे नवे व्यापार निबर्ंध लागू झाले असले तरी व्यापार चर्चा कायम ठेवण्याची तयारी चीनने दाखविली आहे. जागतिक महासत्तेच्या भूमिकेमुळे १० महिन्यात चीनला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादित वस्तूंवर २५ टक्के म्हणजेच ५० अब्ज डॉलर तर अन्य वस्तूंवर १० टक्क्य़ांपर्यंत, २०० अब्ज डॉलरचे शुल्क भरावे लागत आहे.

First Published on May 7, 2019 1:48 am

Web Title: us 200 billion tax on chinese goods