सलग दोन दिवस चालणाऱ्या अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या बैठकीत तूर्त व्याजदर आहे त्याच स्थितीत ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले. बँकेच्या अध्यक्षा जनेट येलेन यांनी येत्या सप्टेंबरमध्ये त्याबाबत निर्णय घेण्याचे स्पष्ट केले.
जागतिक महासत्तेत २००८ मध्ये उद्भवलेल्या आर्थिक मंदीपासून तेथील व्याजदर सध्या शून्य टक्क्यावरच आहेत. गेल्या काही वर्षांपासून रुळावर येत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यात वाढ होण्याची अटकळ बांधली जात आहे.
अर्थव्यवस्थेतील सुधार कायम राहिल्यास तसेच देशातील बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने कमी झाल्यास व्याजदर वाढीचा निर्णय निश्चित घेतला जाईल, असे येलेन यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. बँकेची पुढील बैठक आता १६ व १७ सप्टेंबरदरम्यान होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 1:25 am