आर्थिक मंदीच्या सावटापोटी बिकट निर्णय घेणाऱ्या जागतिक महासत्तेने गेल्या तिमाहीत आश्चर्यकारक सकल राष्ट्रीय उत्पन्नात भर नोंदविली आहे. देशाचे उत्पन्न (जीडीपी) जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात २.८ टक्क्य़ांवर गेले आहे. आधीच्या एप्रिल ते जून या दरम्यान २.५ टक्के होते. देशाच्या फेडरल बँकेकडून रोखे खरेदी तूर्त कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे उत्पन्नात २ टक्क्य़ांपर्यंत घट होते की काय अशी भिती होती. अमेरिकेला मध्यंतरी सरकारी खर्चनियंत्रणासाठी रोजगार कपातही करावी लागली होती.
युरोपीय बँकेचे व्याजदर नीचांकावर
युरोपीयन बँकेने बहुप्रतिक्षित व्याजदर धोरण नरमाईचे आखताना ती किमान पातळीवर आणून ठेवले आहे. युरोपातील ऑक्टोबरमधील महागाई ०.७ पर्यंत घसरल्याने व्याजदर २ टक्क्य़ांच्या खाली आणून ठेवले आहेत. युरोपातील विविध १७ देशांमध्ये युरो हे समान चलन असलेल्या या परिसरातील अर्थव्यवस्था आता सुधारत असल्याचे चित्र आहे. युरोपीयन बँकेचे अध्यक्ष मारियो ड्रागी यांनी व्याजदर कपातीचे धोरण यापुढेही कायम राहिल, असे स्पष्ट केले आहे. नजीकच्या दिवसात व्याजदर शून्यापर्यंतही येऊ शकतो.