सध्याच्या युगात जवळजवळ सर्वच क्षेत्रात माहिती-तंत्रज्ञानाने (आयटी) प्रवेश केला आहे. आयटीमुळे अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल आणि विकास घडून आल्याने आयटीची अपरिहार्यता जाणवू लागली. हे होत असतानाच सॉफ्टवेअरच्या पायरसीतदेखील वाढ झाल्याचे दिसून येते. अशाप्रकारे पायरेटेड सॉफ्टवेअरच्या वापराने अधिकृत सॉफ्टवेअर बनविण्ऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. ह्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अमेरिकेने ‘अनफेअर कॉम्पिटिशन अॅक्ट’ (युसीए) लागू केला आहे.
जुलै २०११ मध्ये ‘अनफेअर कॉम्पिटिशन अॅक्ट’ (युसीए) अमेरिकेच्या वॉशिंग्टन आणि लुईझियाना या राज्यांमध्ये लागू करण्यात आला. बेकायदेशीरपणे आयटी उत्पादनाचा प्रसार आणि वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार ‘युसीए’मुळे या दोन राज्याच्या शासनांना प्राप्त झाला. या दोन राज्यांसोबतच, ३६ राज्यांच्या आणि अमेरिकेच्या ३ प्रांताच्या महान्यायप्रतिनिधींनी ‘यूएस फेडरल ट्रेड कमिशन’ (युएफटीसी)ला आयटीचा कायदेशीर वापर आणि यातील कायदेशीर स्पर्धेची खात्री करण्यासाठी लेखी निवेदन दिले.
भारतीय आयटी उत्पादक आणि निर्यातदार यांच्यासाठी ‘यूसीए’ एक वरदान
एएसएसओसीएचएएम आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे ‘भारतीय निर्मिती निर्यातदारांसाठी उद्योन्मुख संधी’ या विषयावर अभ्यास सत्र आयोजित केरण्यात आले होते. भारत, चीन, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम इत्यादींच्या तुलनेत अमेरिकेतील बाजारात पायरेटेड आयटी उत्पादनांचा वापर फार कमी असल्याचे या अभ्यास सत्रात लक्षात आले. यावरून ‘यूसीए’ भारतीय आयटी उत्पादक आणि निर्यातदारांसाठी एक नवी संधी आणत असल्याचे देखील या अभ्यास सत्रात जाणवले.
या संधीचा वापर कसा कराल?
अमेरिकी बाजारातील अधिकृत आयटी उत्पादनाच्या वापरासाठीच्या संधीचा वापर करून आपली आयटी उत्पादने निर्यात करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्यांची आयटी उत्पादने आणि मालमत्ता कायदेशीर करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे योग्य ते परवाने आणि मान्यता प्रमाणपत्र असल्याची खात्री करण्याची सुद्धा गरज आहे. हे केल्यानंतर, ते ‘सॉफ्टेवेअर अॅसेट मॅनेजमेंट’ (एसएएम) ची अंमलबजावणी करू शकतात, त्याचप्रमाणे अधिकृत सॉफ्टेवेअर प्रकाशकासोबत आयटी उत्पादनाचे ऑडिट करू शकतात. हे केल्यास त्यांना मान्यता प्रमाणपत्र मिळू शकते.