मुंबई : डिजिटलीकरणातील अग्रणी कंपनी वक्रांगी लिमिटेडने मुंबई महानगर क्षेत्रात विविध ठिकाणी त्यांच्या पहिल्यावहिल्या ५० हून अधिक नेक्सजेन वक्रांगी कें द्राची सुरुवात केली आहे. मुंबईतील उपनगरांसह आणि महानगर क्षेत्रातील निमशहरी क्षेत्रांमध्ये कंपनीची ही केंद्रे बँकिंग, एटीएम, विमा, अन्य वित्तीय सेवा, ई-कॉमर्स, ई-गव्हर्नन्स आणि लॉजिस्टिक्स इत्यादी विविध क्षेत्रांत डिजिटल सेवा नागरिकांना देतील.

पुढील काही महिन्यांत सध्याच्या देशस्तरावर कार्यरत असलेल्या  ४५ हजारांहून अधिक केंद्रांमध्ये सुधारणा करण्यावर कंपनी आपले लक्ष केंद्रित करणार आहे.

नेक्स्टजेन केंद्रांमध्ये आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी अत्यावश्यक एटीएम सेवा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने केंद्रीकृत देखरेख, ब्रँड भागीदारांसाठी डिजिटल चिन्हांद्वारे डिजिटल जाहिराती,

याशिवाय सर्व प्रकारची देयके यंत्रणा सक्षम करण्यासाठी बायोमेट्रिक आणि पिन पॅड उपकरण अशा प्रकारच्या तांत्रिक सुधारणांचा यामध्ये समावेश आहे.

वर्ष २०२० पर्यंत भारतातील सर्व पिनकोड क्षेत्रापर्यंत पोहोचत, एकूण ७५ हजार वक्रांगी सेवा केंद्रे उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य असल्याचे वक्रांगी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी दिनेश नंदवाना यांनी सांगितले.

हा प्रचंड उपक्रम हाती घेऊन कंपनीने ग्राहकांना विविधांगी सेवा पुरविण्यासह, मोठी रोजगार निर्मिती, समानता आणि शहरी-ग्रामीण भागातील विषमता दूर करण्याच्या दृष्टीनेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे, असे ते म्हणाले.