News Flash

निर्गुतवणूक आता खरेदीदारांच्या शर्तीवर?

चालू आर्थिक वर्षांत भाग विक्री प्रक्रिया लांबण्याची चिन्हे असलेल्या हिंदुस्तान झिंकमधील सरकारचा उर्वरित सर्व हिस्सा मूल्य आकर्षक असेल तरच खरेदी करण्यास वेदान्ता समूहाने उत्सुकता दर्शविली

| February 5, 2014 07:09 am

आकर्षक किंमतीसाठी आग्रह धरून सरकारची कोंडी
चालू आर्थिक वर्षांत भाग विक्री प्रक्रिया लांबण्याची चिन्हे असलेल्या हिंदुस्तान झिंकमधील सरकारचा उर्वरित सर्व हिस्सा मूल्य आकर्षक असेल तरच खरेदी करण्यास वेदान्ता समूहाने उत्सुकता दर्शविली आहे. तर सरकारी मालकीच्या ओएनजीसी, ऑईल इंडियानेही निर्गुतवणुकीसाठी माथी मारण्यात आलेल्या इंडियन ऑईलची समभाग खरेदी ही गेल्या सहा महिन्यांतील सरासरी दरानेच करण्याची तयारी दर्शविली आहे.
हिंदुस्तान झिंकमधील सरकारचा हिस्सा खरेदी करण्यासाठी या कंपनीची सध्या मालकी असणाऱ्या वेदान्ता समूहाने तयारी दाखविली आहे. मात्र त्याबाबतची किंमत आकर्षक असेल तरच आपण प्रक्रियेत भाग घेऊ, असे समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी म्हटले आहे. अगरवाल यांनी मंगळवारीच केंद्रीय अर्थव्यवहार सचिव अरविंद मायाराम यांची भेट घेतली. वेदान्त समूहाचा हिंदुस्तान झिंकमध्ये ६४.९२ टक्के हिस्सा आहे. त्याचबरोबर बाल्को या पूर्वाश्रमीच्या सरकारी कंपनीतही समूहाचा ५१ टक्के हिस्सा आहे. या दोन्ही कंपन्यांमधील सरकारचा उर्वरित सर्व हिस्सा १७,२७५ कोटी रुपयांना खरेदी करण्याचे समूहाने सरकारला यापूर्वी सांगितले होते. विद्यमान स्थितीत ५२,९०० कोटी रुपये भागभांडवल असलेल्या हिंदुस्तान झिंकमधील सरकारच्या हिस्सा खरेदीसाठी अगरवाल यांना आता अधिक आकर्षक किंमत अपेक्षित आहे.
इंडियन ऑईलमधील सरकारचा ५% हिश्श्याची खरेदी ही गेल्या सहा महिन्यांतील समभागाची सरासरी किमतीच्या दरानेच ओएनजीसी व ऑईल इंडिया या कंपन्या खरेदी करतील. सध्याचा समभाग दर लावणे योग्य नसल्याची तक्रार खुद्द केंद्रीय तेल व वायू मंत्रालयानेच केली आहे. ३०० रुपये या उच्चांकाला पोहोचलेल्या कंपनीच्या समभागाचे मूल्य सध्या कमालीचे रोडावले आहे. तेव्हा सध्याच्या दरापेक्षा गेल्या सहा महिन्यातील सरासरी दराने इंडियन ऑइलचे २४.२७ कोटी समभाग खरेदी करण्याविषयी उभय कंपन्यांनी तेल मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. ओएनजीसीचा सध्या इंडियन ऑईलमध्ये ८.७७ टक्के हिस्सा आहे.
चालू आर्थिक वर्षांचे ४० हजार कोटी रुपयांचे र्निगुतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची धडपड सुरू असलेल्या केंद्र सरकारला वित्तीय वर्ष संपण्यास दोन महिनेही शिल्लक राहिले असताना केवळ ३ हजार कोटी रुपयेच उभारले गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 7:09 am

Web Title: vedanta to bid for hindustan zinc shares if price lucrative
Next Stories
1 ध्वनिलहरी परवाने लिलाव : सरकारला उद्दिष्टापेक्षा अधिक प्राप्ती
2 मंथली इन्कम प्लॅन्स
3 ‘चेअर वूमन’
Just Now!
X