01 March 2021

News Flash

कंपन्यांना धन‘लाभ’!

नोव्हेंबरमध्ये वाहन विक्रीत ५ टक्के भर

(संग्रहित छायाचित्र)

 

धनत्रयोदशी असलेल्या (दिवाळीच्या) महिन्यात देशातील प्रवासी वाहन विक्री वार्षिक तुलनेत ४.६५ टक्क्यांनी वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये विक्री झालेल्या वाहनांची संख्या २,६४,८९८ नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, नोव्हेंबर २०१९ मध्ये ती २,५३,१३९ होती.

गेल्या महिन्यातील धनत्रयोदशीसारख्या मुहूर्ताला खरेदीदारांनी वाहनांसाठी नोंदणीपसंती दर्शविल्याने प्रवासी वाहन विक्री वाढल्याचे वाहननिर्मिती संघटना ‘सिआम’ने स्पष्ट केले. तर गेल्या महिन्यात दुचाकी वाहनांची विक्रीही दुहेरी अंकवृद्धी नोंदणारी ठरली.

नोव्हेंबर २०२० मध्ये दुचाकी विक्री १३.४३ टक्क्यांनी वाढून १६,००,३७९ पर्यंत गेली. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती १४,१०,९३९ होती. यामध्ये यंदा मोटारसायकल विक्री १४.९ टक्क्यांनी वाढून १०,२६,७०५ झाली आहे. तर स्कूटर विक्री ९.२९ टक्क्यांनी वाढत ५,०२,५६१ झाली आहे.

तीनचाकी वाहनांमध्ये मात्र यंदा घसरण झाली आहे. तीनचाकी वाहन विक्री वर्षभरापूर्वीच्या, नोव्हेंबर २०१९ मधील ५५,७७८ वरून यंदा २३,६२६ वर येऊन ठेपली आहे.

नोव्हेंबरमध्ये एकूण वाहन विक्री ११.०२ टक्क्यांच्या वाढीसह १९,०९,३७२ झाली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये ती १७,१९,८७४ होती.

नव्या वर्षांत किंमतवाढ

नव्या वर्षांच्या पहिल्याच महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढविण्यात येणार असल्याचे अनेक कंपन्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये देशातील वाहन विक्री बाजारपेठेत निम्मा हिस्सा राखणाऱ्या मारुती सुझुकीचाही समावेश आहे. कंपनीने नेमके किंमतवाढीचे प्रमाण अद्याप स्पष्ट केले नसले तरी जानेवारीपासून किमती वाढतील, असे संकेत दिले आहेत. फोर्ड इंडिया, स्कोडा यांनीही यापूर्वीच किमतवाढ जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:13 am

Web Title: vehicle sales up 5 per cent in november abn 97
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : षटकार!
2 ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादनात ३.६ टक्के वाढ
3 देशातील सर्वात मोठ्या मद्यनिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला
Just Now!
X