गेल्या तीन दशकांपासून दुबईत वास्तव्यास असलेल्या व मुळच्या मुंबईकर कोरगावकर दांपत्याने आरेखन केलेल्या सर्वात उंच हॉटेलचा समावेश गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. अशोक व आरती कोरगावकर यांनी दुबईतील जेडब्ल्यू मेरिएट माक्र्वेस या सर्वात उंच हॉटेलचे आरेखन स्वत: केले आहे.
शहरातील बिझिनेस बे या भागातील या हॉटेलची उंची ३५५ मीटर असून न्यूयॉर्कमधील ‘एम्पायर स्टेट’ या इमारतीपेक्षा ती केवळ २६ मीटरनेच कमी आहे. ७७ मजल्यांचे दोन टॉवरचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक टॉवरमध्ये ८०४ खोल्या आहेत. याव्यतिरिक्त येथे १४ रेस्टॉरन्ट, बार, लाऊन्ज, बॉल रुम आहेत. शहरातील जागतिक दर्जाचे पहिले कन्व्हेशन हॉटेल असलेल्या या इमारतीत एकाचवेळी एक हजार लोकांच्या राहण्याची, त्यांच्या खानपानाची सोय होऊ शकते.
या हॉटेलचा समावेश असलेले एक टॉवर, काही रेस्टॉरन्ट व बार गेल्याच महिन्यात खुले झाले. उर्वरित बार व इतर सुविधा या फेब्रुवारी २०१३ मध्ये सुरू करण्यात येणार आहेत. याचवेळी या हॉटेलचे उद्घाटनही होणार      आहे. तर दुसरे टॉवर फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू होईल.
अशोक कोरगावकर यांनी दादरच्या रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमधून या विषयाचे शिक्षण घेतले होते. दुबईत त्यांची आर्चग्रुप ही वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन कंपनी असून ते स्वत: या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. शहरात त्यांनी ४०० हून अधिक प्रकल्पांचे आरेखन केले आहे.     

महागाई दर वार्षिक ५ ते ६ टक्के राहिला तरी तो काही फार मोठा नाही. भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रवासासाठी हा दरही सुस आहे. देशात आर्थिक सुधारणांचे पर्व कायम राहिल्यास येत्या दोन वर्षांत आर्थिक विकास दर ९ टक्के असू शकेल.
– कौशिक बसू,
जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ (बुधवारी कोलकत्ता येथे)