सामान्य विमा क्षेत्रातील व्यवसायास तब्बल नऊ महिन्यानंतर व्हिडिओकॉन समूहाने अखेर सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या लिबर्टीबरोबर भागीदारी करत या व्यवसायाचा परवाना समूहाला गेल्या मे २०१२ मध्ये मिळाला होता. यामध्ये लिबर्टीचा हिस्सा २६ टक्के आहे. व्हिडिओकॉन हा समूह ९ अब्ज डॉलरचा असून लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्स समूह जगातील सहावी मोठी विमा कंपनी आहे. भारतीय विमा व्यवसायात यामार्फत २७ व्या कंपनीचा शिरकाव झाला आहे. वार्षिक १५ टक्क्यांनी वाढणारा भारतीय सर्वसाधारण विमा उद्योग २०२० पर्यंत ५० अब्ज डॉलरचा होण्याचा अंदाज आहे. लिबर्टी व्हिडिओकॉन जनरल इन्शुरन्स नावाने हा व्यवसायास सुरू होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 12:38 pm