दहाहून अधिक बँकांनी कोटय़वधींचे कर्जबुडवे म्हणून जाहीर केलेले विजय मल्ल्या हे आता भारत सोडून जाणार असून ते ब्रिटनमध्ये स्थायिक होणार आहेत. अध्यक्षपदाचा हट्ट राखणाऱ्या मल्ल्या यांनी अखेर दिआज्जिओचे वर्चस्व असलेल्या यूनायटेड स्पिरिट्सवरून (यूएसएल) पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात मल्ल्या यांना ७.५ कोटी डॉलर (५१५ कोटी रुपये) मिळणार आहेत. मल्ल्या यांच्या यूनायटेड स्पिरिट्सवर ब्रिटनच्या दिआज्जिओने निम्म्याहून अधिक हिस्सा खरेदी करत मालकी मिळविली आहे. मात्र असे होऊनही मल्ल्या यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता.