स्वत:चे आभासी चलन आणू पाहणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने आभासी चलनातील व्यवहाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलन व्यवहार मंचाबाबत निर्वाळा देतानाच आभासी चलन व त्यांचे व्यवहार याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

आभासी चलनाबाबतची चिंता तसेच धोक्यांबाबत रिझव्‍‌र्ह बँक सरकारबरोबर चर्चा करणार असून यातून लवकरच योग्य तो मार्ग काढला जाईल, असे दास यांनी स्पष्ट केले.

एका इंग्रजी वित्त वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दास यांनी आभासी चलनाचे व्यवहार होणाऱ्या मंचाबाबत (ब्लॉकचेन) ही यंत्रणा भिन्न असून आभासी चलनाचे व्यवहार हे निराळे असल्याचे स्पष्ट केले. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने आभासी चलनामार्फत होणाऱ्या व्यवहारांबाबत सरकारबरोबरच्या चर्चेनंतर वेळीच निर्णय घेतले जातील, असेही गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले.

सरकार रिझव्‍‌र्ह बँके च्या माध्यमातून स्वत:चे आभासी चलन आणू पाहत असून कं पन्या तसेच अन्य असे चलन आणण्यापासून प्रतिबंध करणारे विधेयक संसदेत सादर करण्याच्या तयारीत आहे. मात्र आभासी चलनाचे व्यवहार होणाऱ्या मंचाला परवानगी देण्याच्या विचारात सरकार आहे.

सध्या चीनच्या सरकारी मध्यवर्ती बँके चे असे (युआन) आभासी चलन अस्तित्वात आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने २०१८ मध्ये बँक तसेच अन्य वित्त यंत्रणांना आभासी चलन व्यवहारासाठी बंदी घातली होती.