अमेरिकी मुख्याधिकाऱ्याच्या कबुलीने खळबळ

डिझेल वाहनांमधील सॉफ्टवेअर चलाखीतून वायू प्रदूषणाची मात्रा कमी दाखविली जाऊन फसवणूक केली जात असल्याची बाब आपल्याला वर्षभरापूर्वीच माहिती असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट फोक्सव्ॉगनच्या अमेरिकेतील मुख्याधिकाऱ्यानेच गुरुवारी केला. दरम्यान, कंपनीच्या जर्मनीतील मुख्यालयावर गुरुवारी पोलिसांनी धाड टाकल्याचे समजते.
फोक्सव्ॉगनच्या अमेरिकेतील व्यवसाय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल हॉर्न यांनी संसदीय समितीसमोर याबाबत माफी मागतानाच आपल्याला ही बाब २०१४ मध्येच माहिती होती असे सांगितले. फोक्सव्ॉगनची वाहने ही मंजूर मर्यादेच्या ४० पट अधिक वायू प्रदूषण करीत असल्याच आरोप आहे.

भारतातील ३८९ ‘पोलो’ माघारी
वादग्रस्त फोक्सव्ॉगनने तिची भारतातील सर्वाधिक खपाची हॅचबॅक ‘पोलो’ची विकली गेलेली ३८९ वाहने सदोष हँड ब्रेकपोटी माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सदोष वाहने सप्टेंबरमधील एकाच तुकडीत तयार झाली आहेत. कंपनीने दिवसापूर्वीच पोलोची भारतात विक्री थांबविण्याचा निर्णय जाहीर करत तो सर्व वितरकांना कळविला आहे.