13 August 2020

News Flash

व्होल्टास एअर कूलर उत्पादन निर्मितीत

भारतीय वातानुकूलित यंत्र निर्मितीत वर्चस्व असलेल्या टाटा समूहातील व्होल्टास लिमिटेडने एअर कूलर उपकरण उत्पादनात शिरकाव केला आहे.

| May 6, 2015 06:46 am

भारतीय वातानुकूलित यंत्र निर्मितीत वर्चस्व असलेल्या टाटा समूहातील व्होल्टास लिमिटेडने एअर कूलर उपकरण उत्पादनात शिरकाव केला आहे. याद्वारे कंपनीने या श्रेणीत एक लाख उपकरण विक्रीचे लक्ष्यही जाहीर केले आहे. वर्षभरात कंपनीचा ५,००० रुपयांतील एअर कूलरही बाजारात धडकेल.

कंपनीने फ्रेश एअर कूलर सादर करतानाच या गटात येत्या तीन वर्षांत वरच्या तीनमध्ये स्थान निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. ही रक्कम १५० कोटी रुपये असेल. एअर कूलर बाजारपेठेत आघाडीतील तीन नाममुद्रांमध्ये स्थान मिळविण्याचा मनोदय या निमित्ताने व्यक्त करताना कंपनीचे अध्यक्ष व मुख्य परिचलन अधिकारी प्रदीप बक्षी यांनी पंखे आणि वातानुकूलित यंत्र यांच्यातील तफावत या श्रेणीद्वारे कमी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
एअर कूलरमार्फत १० टक्के महसूल अपेक्षित असणाऱ्या व्होल्टासने वर्षभरात एक लाख नव्या उत्पादनाच्या तर चालू वर्षांत १० लाख वातानुकूलित यंत्रे विक्रीचे लक्ष्य राखले आहे. कंपनीच्या एअर कूलरची किंमत ८,००० ते १५,००० रुपये आहे. कंपनी येत्या वर्षांत १० उपकरणांसह ५,००० रुपये मूल्याचे नवे उपकरणही सादर करेल, असेही या वेळी सांगण्यात आले.
व्होल्टासकडे विविध ७८ प्रकारांतील वातानुकूलित यंत्रे आहेत. कंपनीच्या एकूण वातानुकूलित यंत्रांपैकी १५ टक्के विक्री ही उद्योग, आस्थापना यांना लागणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2015 6:46 am

Web Title: voltas enters into air cooler production
टॅग Business News
Next Stories
1 बाजारहिस्सा दुपटीने वाढविण्याचे ‘व्हिडीओकॉन’चे लक्ष्य
2 आदित्य बिर्ला समूहातील वस्त्र व्यवसाय एकत्र
3 किरकोळ विक्री क्षेत्र वेग वाढला
Just Now!
X