वॉलमार्ट ही किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील जगातील सर्वात बलाढ्य कंपनी म्हणून ओळखली जाते. याच वॉलमार्टने भारतातील फ्लिपकार्ट या कंपनीला विकत घेतले आहे. फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी म्हणून ओळखली जाते. फ्लिपकार्ट विकत घेण्यासाठी वॉलमार्टला तब्बल ११ हजार १३१ कोटी रुपयांची किंमत मोजावी लागली.

वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन गेली दोन वर्ष फ्लिपकार्टला विकत घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु काही आर्थिक मतभेद व थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून भारतातील किराणा क्षेत्राने याबाबत घेतलेला आक्षेप यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. सुरवातीला ५ हजार १०६ कोटी रुपयांत वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घ्यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, नंतर फ्लिपकार्टने ११ हजार १३१ कोटी रुपयांवर तडजोड केली. अशी माहिती टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप न्यूज पोर्टलच्या रिपोर्टमध्ये दिली आहे.