आघाडीची पंप उत्पादक कंपनी सी.आर.आय. पंप लिमिटेडने मिलान, इटलीस्थित ‘एफआयपीएस’ या कंपनीचे नुकतेच संपादन केले असून, या अधिग्रहणातून कंपनीला नव्या व्यवसायाचा मार्ग खुला झाला आहे. इटलीस्थित या कंपनीकडे उपलब्ध तंत्रज्ञानातून सी.आर.आय.ला भारतात सांडपाणी आणि मलनिस्सारणासाठी उपयुक्त पंपांची संपूर्ण श्रेणी प्रस्तुत करता येणार आहे.

प्रामुख्याने महानगरपालिकांना शहरातील सांडपाणी, पावसाळ्यात भरणारे पाणी तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये बाहेर सोडले जाणारे उर्वरक यांच्या व्यवस्थापनाची परिपूर्ण उपाय सी.आर.आय.ला सादर करता येतील. भारतात अशा उपाययोजनांची बाजारपेठ ही साधारण २,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे. वाढते शहरीकरण, होऊ घातलेले स्मार्ट सिटी प्रकल्प आदी पाहता, त्यात येत्या काळात मोठय़ा दराने वाढ अपेक्षित आहे.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
fund Analysis Nippon India Growth Fund Fund assets
Money Mantra: फंड विश्लेषण: निपॉन इंडिया ग्रोथ फंड

सी.आर.आय. पंपचे उपाध्यक्ष जी. सुंदरराजन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पेयजलाचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता, जल व्यवस्थापनाचे महत्त्व वाढले आहे. सी.आर.आय. पंपच्या विदेशात सात उपकंपन्यांसह, भारतातही ३२ शाखांसह सशक्त अस्तित्व आहे. सांडपाणी व्यवस्थापनातील देशातील क्रमांक एकची कंपनी बनण्याचा आपला मानस असल्याचे सुंदरराजन यांनी स्पष्ट केले.

 

ऑर्सुकच्या ऑनलाईन व्यवहारांचा प्रारंभ

मुंबई : ऑर्सुक.कॉम  या सोने व हिरे दागिने क्षेत्रातील आघाडीच्या ब्रँडने मौल्यवान दागिन्यांची खरेदी करणे सोपे तसेच काळजीमुक्त व्हावे यासाठी ऑनलाइन व्यवहार सेवा दाखल केली आहे.

या सेवेअंतर्गत विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी बीआयएस हॉलमार्क (९१६) सोन्याचे तुकडे, सोलेटेयर जेमोलॉजिकल लॅबॉरेटरीजने प्रमाणित केलेले हिरे आणि मागणीनुसार घडवलेले दागिने परवडणारम्य़ा किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या पसंतीच्या डिझाइन्स आणि परवडणारी किंमत या दोन गोष्टींवर भर असल्यामुळे ऑर्सुक बाजारपेठेत इतरांपेक्षा वेगळी ठरते. याला अजोड दर्जाची खात्री आणि विश्वसार्ह किंमतीची जोड देण्यात आली आहे.