News Flash

लवकरच उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीसाठी जलव्यवस्थापन

सिंचन व जलव्यवस्थापनातील हा पहिलाच खासगी पुढाकाराचा तंत्रज्ञानाधारित उपक्रम आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शेतकऱ्यांना आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करणे शक्य होणार आहे. ठिबक सिंचन सुविधा पुरवणारी आघाडीची कंपनी रिवुलीस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ‘मन्ना’ या उपग्रहआधारित सॉफ्टवेअर सुविधेची घोषणा केली. सिंचन व जलव्यवस्थापनातील हा पहिलाच खासगी पुढाकाराचा तंत्रज्ञानाधारित उपक्रम आहे.

जलव्यवस्थापन आणि जलसंधारण यांचा एकत्रित मेळ घालून किफायतशीर शेती करणे हा शेतकऱ्यांसाठी एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. ‘मन्ना’ प्रणालीने अगदी अमेरिका, मेक्सिको, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलसारख्या शेतीच्या क्षेत्रात पुढारलेल्या देशांमध्ये यशस्वीपणे त्या त्या ठिकाणसाठी आवश्यक असलेली आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता ही सुविधा भारतामध्ये दाखल होत असल्याचे रिवुलिस इंडियाचे संचालक सुधीर मेहता यांनी सांगितले.

कंपनीने कृषी मंत्रालयाशीही संपर्क साधला असून, ती विविध राज्यात सरकारबरोबर सहकार्यास उत्सुक आहे. हे वेब व मोबाइल आधारित सॉफ्टवेअर शेतकऱ्यांना अत्यंत किफायतशीर किमतीला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सध्या ‘रिवुलीस’चा भर हा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूच्या काही भागांवर आहे. सुरुवातीला या सेवेचा सर्व भर हा कापूस, ऊस, डाळिंब, द्राक्षे, बटाटा आणि टोमॅटो या पिकांवर असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:25 am

Web Title: water management for agriculture based on satellite technology abn 97
Next Stories
1 इंडियन ऑइलचे दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन
2 कमकुवत मागणीवर उतारा ; हिंदुस्थान युनिलिव्हरकडून किमतीत ३० टक्के कपात
3 निर्देशांक उभारी अल्पायुषी
Just Now!
X