06 August 2020

News Flash

निर्देशांक माघारी

कंपन्यांच्या नफा घसरणीने भांडवली बाजारात सप्ताहअखेर चिंता

संग्रहित छायाचित्र

कंपन्यांच्या वाढत्या नफा घसरणीच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांने भांडवली बाजारात सप्ताहअखेर चिंता नोंदली गेली. दोन्ही प्रमुख जवळपास अर्ध्या टक्क्याहून कमी प्रमाणात खाली आल्याने सेन्सेक्स व निफ्टी हे त्याच्या गेल्या चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावरूनदेखील माघारी फिरले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवार सत्रअखेर १४३.३६ अंश घसरणीने ३६,५९६.३३ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ४५.४० अंश घसरणीसह १०,७६८.०५ पर्यंत येऊन थांबला.

आशियाई भांडवली बाजारातही शुक्रवारी घसरणीचेच चित्र होते.

मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक अशा बँक व वित्त क्षेत्रातील समभागांना घसरणीचा अधिक फटका बसला. त्याचबरोबर टायटन कं पनी, ओएनजीसीदेखील घसरले.

रिलायन्स इंडस्ट्रिज, सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर, भारती एअरटेल तसेच टीसीएस आदी जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

आठवडय़ात सेन्सेक्समध्ये ५७२.९१ अंश तर निफ्टीत १६०.७० अंश भर पडली आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, वित्त तसेच ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, बहुपयोगी वस्तू निर्देशांक २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर ऊर्जा, दूरसंचार, आरोग्यनिगा, स्थावर मालमत्ता क्षेत्रीय निर्देशांक त्याच प्रमाणात वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यापर्यंत घसरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:14 am

Web Title: weak weekend worries in capital markets abn 97
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : सकारात्मकता टिकून..
2 निर्देशांक चार महिन्यांच्या उच्चांकाला
3 विम्याच्या दाव्यातही ऑनलाइन प्रक्रियेची सुलभता
Just Now!
X