18 October 2019

News Flash

कर्मचारी संप, सलग सुट्टय़ांमुळे बँक व्यवहारांना सप्ताहाभराचा खंड

सलग सप्ताहभर बँकांचे व्यवहार विस्कळीत

(संग्रहित छायाचित्र)

बँकांच्या महाविलीनीकरणाला विरोधासाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या आठवडय़ात दोन दिवसांच्या संपाची हाक दिली असून, या आंदोलनासह लागून आलेल्या सुट्टय़ांमुळे सलग सप्ताहभर बँकांचे व्यवहार विस्कळीत होणार आहेत.

देशातील दहा सार्वजनिक बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी चार प्रमुख बँक संघटनांनी येत्या २६ व २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. मात्र चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्टीला जोडून हे आंदोलन होणार असल्याने बँकांचे व्यवहार ठप्प पडण्याची चिन्हे आहेत. शिवाय सोमवारी, ३० सप्टेंबरला अर्ध वार्षिक हिशेबासाठी बँक शाखांचे दरवाजे ग्राहकांना नियमित व्यवहारासाठी बंद असतील. मंगळवारचा (१ ऑक्टोबर) अपवाद केल्यास बुधवारी (२ ऑक्टोबर) गांधी जयंतीनिमित्त सुटीमुळे बँकांचे व्यवहार होणार नाहीत.

‘एआयबीओसी’, ‘एआयबीओए’, ‘आयएनबीओसी’ व ‘एनओबीओ’ या चार बँक कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यानंतर ‘आयबीए’ या बँक व्यवस्थानाच्या संघटनेनेही बँकांचे व्यवहार संपामुळे विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली आहे.

First Published on September 18, 2019 1:49 am

Web Title: weekly breaks for bank transactions abn 97