मुंबई :  महाराष्ट्रात आठवडय़ासाठी टाळेबंदी लागू झाली तर एकूण भारतीय अर्थव्यवस्थेला या दरम्यान १.२५ अब्ज डॉलरचा फटका बसेल, अशी भीती ‘बार्कलेज’ या युरोपिय दलाली पेढीने व्यक्त केली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात १.४० टक्के घसरण होईल, असेही ‘बार्कलेज’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. संभाव्य निर्बंध लांबत जाऊन मेअखेपर्यंत कायम राहिल्यास अर्थव्यवस्थेचे १०.५ अब्ज डॉलर तर विकास दराला ३.४० टक्के फटका बसेल, असा इशारावजा अंदाजही ‘बार्कलेज’ने स्पष्ट केला आहे.

देशाच्या उद्योग जगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने,  सध्याच्या स्थितीत टाळेबंदीसारखे उपाय नकोत, असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. तर सर्व वयोगटाच्या नागरिकांचे सरसकट लसीकरण, त्यासाठी लसींचे गतिमानतेने उत्पादन हाच सध्याच्या संकटातून वाचविण्याचा उपाय ठरेल, असे म्हटले आहे.