टीबीझेडचे प्लॅटिनम दागिने
तयार दागिने, आभूषणांची दालने गेल्या १५० वर्षांपासून चालविणाऱ्या टीबीझेड अर्थात त्रिभुवनदास भीमजी ज्वेलरीने यंदाच्या मकर संक्रांतीनिमित्ताने महिला वर्गासाठी दागिन्यांची विशेष श्रेणी सादर केली आहे. प्लॅटिनम धातूप्रकारातील या दागिन्यांमध्ये पेण्डण्टचा समावेश आहे. यामध्ये हिरे व रत्ने बसविण्यात आली आहेत. त्यांची किंमत ३५ हजार ते ४० हजार रुपयांदरम्यान आहे.
अर्बानाचे मोसमातील शीत वस्त्रे
अर्बानाची यंदाच्या मोसमातील नवीन वस्त्रप्रावरणे देशातील निवडक दालनांमध्ये दाखल झाली आहेत. यानुसार कंपनीच्या दालनांशिवाय सेन्ट्रल व पॅण्टालूनच्या दालनांमध्ये पुरुष तसेच महिला, मुले या वर्गासाठी हिवाळ्यातील विविध कपडे सादर करण्यात आले आहेत. त्यांची किंमत २३९९ ते २८९९ रुपयांदरम्यान आहे. अन्य प्रकारातील कपडेही उपलब्ध आहेत.
फॅबअ‍ॅले.कॉमवर नवे दागिने
फॅबअ‍ॅले.कॉम या महिलांसाठीच्या दागिने विक्री दालनांच्या व्यासपीठावर या उत्पादनांची नवी श्रेणी झळकविण्यात आली आहे. यामध्ये सोन्याचे नेकलेस, कानातील रिंग आदींचा समावेश आहे. हे दागिने ४०० रुपयांपुढे असून रोख तसेच प्रमुख कार्डद्वारे संबंधित संकेतस्थळावर खरेदी करता येतील.
ओझोनचे आयुर्वेदिक फेस वॉश
ओझोन समूहातील आयुर्वेदिक कंपनीने नवा चंदन प्रकारातील फेस वॉश सादर केला आहे. यामध्ये चंदनासह कोरफड आणि काकडी या नैसर्गिक गुणधर्माचा समावेश करण्यात आला आहे. त्वचा नरम राहण्यास यामुळे मदत मिळते, असा दावा कंपनीने केला आहे. ६० मिलीच्या या उत्पादनाची किंमत ८० रुपये आहे. कंपनी औषध निर्मिती क्षेत्रातही कार्यरत आहे.
मधुर साखर सॅशे प्रकारात
मधुर शुगरने सॅशे प्रकारात नावीन्यपूर्ण खाद्य उत्पादन सादर केले आहे. नैसर्गिक साखरेची चव याद्वारे अबाधित राखण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने एक पाकिटात १०० सॅशे एकत्र देऊ केले असून त्याची किंमत १०० रुपये आहे.
‘कोप्रान’चे स्पार्कल टूथपेस्ट
पारिजात समूहाची औषधी कंपनी कोप्रान लिमिटेडने ‘स्पार्कल’ ब्रॅण्ड नावाने टुथपेस्ट उत्पादन सादर करून ग्राहकोपयोगी उत्पादने (एफएमसीजी) वर्गात प्रवेश केला आहे. ‘स्माईल’ या ब्रॅण्ड नावाने कोप्रानची अनेक औषधी उत्पादने प्रसिद्ध आहेत. मुखनिगा क्षेत्रातील ‘स्पार्कल’ हे टुथपेस्ट कंपनीने ३० ग्रॅम, १०० ग्रॅम आणि २०० ग्रॅम या आकारात प्रस्तुत केली आहे. २०० ग्रॅमचा फॅमिली टुथपेस्ट पॅक हा ७९ रुपयांत व सोबत ३९९ रुपये किमतीची डिस्ने डिव्हीडी मोफत दिली जाईल. तर स्वागत योजना म्हणून ३० ग्रॅमच्या पॅकसोबत अधिक १० टक्के मोफत टूथपेस्टसह १०० ग्रॅमचा पॅक व टूथब्रशही मोफत दिला जाणार आहे.
गोदरेज यमीज्ची नवीन टॉपिंग्ज
रिअल गुड यमीज् या चिकनप्रेमींमध्ये लोकप्रिय बनलेल्या ब्रॅण्डअंतर्गत गोदरेज टायसन फूड्सने नवीन टॉपिंग्ज प्रस्तुत केली आहेत. रेडी कूक प्रकारातील ही फ्रोजन तयार खाद्यान्नं आहेत.  बार्बेक्यू, क्लासिक आणि स्पाइसी अशा तीन प्रकारातील या टॉपिंग्जद्वारे मासांहारप्रेमींना घरच्या घरी सूप, सॅलड्स, रॅप्स, पिझ्झा, चिकन टार्ट, पास्ता, कबाब व तत्सम अनेक पदार्थ अत्यल्प वेळात बनविता येऊ शकतील. यमीज चिकन टॉपिंग्ज २०० ग्रॅमच्या पॅकमध्ये ९० रु. किमतीत उपलब्ध झाले आहे.
ओरिफ्लेमचे आयलाइनर
ओरिफ्लेमने मस्कारा आणि जेल आयलायनर सादर केले आहे. डोळ्यांची सजावट याद्वारे करता येईल. निवडक दालनांमध्ये ही उत्पादने उपलब्ध आहेत. ओरिफ्लेम व्होल्युम बिल्ड मस्कारा व ओरिफ्लेम ब्युटी स्टुडिओ आर्टिस्ट जेल आयनर या नावाने ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत. मस्काराची किंमत ४२९ रुपये, तर आयलायनरची किंमत ४४९ रुपये आहे.
मॅट्रिक्सचे केसांसाठी सिरम
मॅट्रिक्स या मूळच्या अमेरिकन ब्रॅण्डचे केसांसाठी नवे सिरम बाजारात आले आहे. या एकाच उत्पादनात सहा विविध गुण देऊ शकणाऱ्या सिरममध्ये द्राक्षबिया तेलसारख्या नैसर्गिक गुणधर्माचा अंतर्भाव करण्यात आला आहे. भारतातील निवडक सलून दालनांमधून ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे उत्पादन केसांसाठी लावण्याची पद्धतीसह बाजारात आले आहे.
‘ब्लॅकबेरी क्यू ५’ आता २०% स्वस्त
स्मार्टफोन श्रेणीत काही महिन्यांपूर्वी भारतात दाखल झालेले ‘ब्लॅकबेरी क्यू ५’ची आता २० टक्के कमी किमतीत खरेदी शक्य झाली आहे. या स्मार्टफोनची ग्राहकांसाठी नवीन विशेष किंमत १९,९९० रुपये करण्यात आली असून, लाल, पांढरा आणि काळा अशा तीन रंगांमध्ये ते उपलब्ध झाले आहे.
जिओनीचा ‘ईलाइफ ई७’ स्मार्टफोन
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०० आणि अँड्रॉइडसमर्थ अमिगो २.० कार्यप्रणालीवर आधारलेले ‘ईलाइफ ई७’ ही स्मार्टफोनची श्रेणी जिओनीने प्रस्तुत केली आहे. व्यावसायिक वापराच्या डिजिटल कॅमेराचे तंत्रज्ञान प्रथमच स्मार्टफोनमध्ये वापर असे वैशिष्टय़ सांगितले जाणाऱ्या ‘ईलाइफ ई७’ हा फोन त्यातील वेगवान प्रोसेसरमुळे ३डी गेमिंग, फोटो शूटिंगसाठी खास उपयुक्त बनला आहे. प्रोफेशनल लार्गन एम८ लेन्स आणि ऑटोमॅटिक सेंटिंगसह १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा अद्वितीय ठरतो. विविध रंगात उपलब्ध ईलाइफ ई७ची ३२ जीबी आणि १६ जीबी मेमरीसह अनुक्रमे २९,९९९ रु. आणि २६,९९९ रु. विक्री किमत निश्चित करण्यात आली आहे.